WhatsApp युजर्सची मजाच मजा! Instagram चं 'हे' फीचर आता WhatsApp वर येणार, स्टेससचा अनुभव अधिक मजेदार होणार
तुम्ही देखील लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण कोणताही प्रसंग असो, आपले फोटो आणि आपल्या आठवणी WhatsApp वर शेअर करत असतो. WhatsApp वर स्टेटस शेअर करत असतो. तुम्ही देखील सतत WhatsApp वर नवीन फोटो शेअर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची एक आनंदाची बातमी आहे. आता WhatsApp वर तुम्हाला इंस्टाग्रामचं नवीन फीचर मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला WhatsApp वर स्टेटस शेअर करण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे.
आता WhatsApp वर स्टेटस शेअर करणे आणखी मजेदार होणार आहे. खरंतर, कंपनी एक नवीन फीचर घेऊन येत आहे, ज्यानंतर युजर्स त्यांच्या स्टेटसमध्ये स्टिकर फोटो जोडू शकतील. या फीचरमुळे युजर्सना अनेक स्टेटस जोडण्याऐवजी एकाच स्टेटसमध्ये स्टिकर्ससारखे अनेक इमेजेस जोडण्याचा पर्याय मिळणार आहे. हे वैशिष्ट्य काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे फीचर इंस्टाग्रामवर आधीच उपलब्ध आहे. हे युजर्सना त्यांच्या स्टेटसमधील फोटो आणि व्हिडिओंमध्ये अतिरिक्त ईमेज जोडण्याची परवानगी देते. याच्या मदतीने स्टेटस सर्जनशील आणि मजेदार बनवता येते. जेव्हा युजर्स फोटो किंवा व्हिडिओवर स्टिकर फोटो लावतात तेव्हा WhatsApp त्यांना वर्तुळ, हृदय, आयत आणि तारा इत्यादी विविध आकार जोडण्याची परवानगी देणार आहे. युजर्स यामधून त्यांचा आवडता आकार निवडू शकतील. एकदा तुम्ही स्टिकरचा फोटो आणि आकार निवडला की, तुम्हाला त्यांचा आकार बदलण्याचा आणि हलवण्याचा पर्याय देखील मिळेल. त्याच्या मदतीने, युजर्स हे स्टिकर्स त्यांच्या फोटो किंवा व्हिडिओवर इच्छित ठिकाणी लावू शकतील.
हे वैशिष्ट्य सध्या काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. असे मानले जाते की हे नवीन फीचर प्रथम अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल आणि येत्या काही दिवसांत ते सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल. WhatsApp च्या नवीनतम वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी, वेळोवेळी तुमच्या स्मार्टफोनमधील WhatsApp प्ले स्टोअरवरून अपडेट करत राहा.
WhatsApp भारतात त्यांच्या पेमेंट फंक्शनॅलिटीमध्ये UPI लाईटचा समावेश करणार आहे. यामुळे युजर्सना पेमेंट करणे सोपे होईल. UPI लाईट सामान्यतः लहान रकमेच्या व्यवहारांसाठी वापरले जाते आणि त्यासाठी कोअर-बँकिंग सिस्टमची आवश्यकता नसते. हे फीचर आल्यानंतर, WhatsApp द्वारे व्यवहार करणे सोपे होईल आणि युजर्सना वारंवार पिन टाकण्याची गरज भासणार नाही.