काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! (Photo Credit- X)
टोल आणि हायवे टाळण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:
१. तुमचे ठिकाण (Destination) निवडा
सर्वात आधी Google Maps अॅप उघडा. त्यामध्ये तुम्ही जिथून निघणार आहात (Starting Point) आणि जिथे जाणार आहात (Destination) ते ठिकाण टाका. सर्च केल्यानंतर अॅप तुम्हाला प्रवासाचे विविध मार्ग दाखवेल.
२. सेटिंग्स मेन्यूमध्ये जा
स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्स (Three Dots) वर क्लिक करा. अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही युजर्ससाठी हा पर्याय उपलब्ध आहे.
३. ‘Avoid Tolls’ पर्याय निवडा
तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला “Options” किंवा “Route Options” हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. तिथे तुम्हाला दोन महत्त्वाचे पर्याय मिळतील:
एकदा तुम्ही हे पर्याय निवडले की, गुगल मॅप्स आपोआप तुमचा मार्ग अपडेट करेल. विशेष म्हणजे, गुगल मॅप्स या सेटिंग लक्षात ठेवते. त्यामुळे पुढच्या वेळीही तुम्हाला आपोआप टोल-फ्री रस्तेच दाखवले जातील.
हायवे टाळण्याचे फायदे काय?
रोज प्रवास करणाऱ्यांसाठी टोल टॅक्स वाचवणे हा मोठा आर्थिक फायदा आहे. हायवेपेक्षा अंतर्गत रस्ते (Internal Roads) अनेकदा जास्त शांत आणि निसर्गरम्य असतात. कधीकधी हायवेवर मोठ्या गाड्यांची रांग असते, अशा वेळी अंतर्गत रस्ते फायदेशीर ठरतात. ज्यांना संथ आणि सुरक्षित ड्रायव्हिंग आवडते, त्यांच्यासाठी हे पर्याय अत्यंत चांगले आहेत. टोल आणि हायवे टाळून प्रवास करताना प्रवासाचा वेळ थोडा वाढू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे नियोजन नक्की करा.






