OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण
OnePlus 15 स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये अखेर लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी या स्मार्टफोनचे टिझर सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यानंतर आता अखेर हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा लेटेस्ट स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या OnePlus 13 चा सक्सेसर आहे. लेटेस्ट OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm चा लेटेस्ट पावरफुलर Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन 7,300mAh बॅटरीने सुसज्ज आहे. वनप्लसचा हा फोन 120W Super Flash वायर्ड आणि 50W वायलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायामध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
OnePlus 15 स्मार्टफोन पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB यांचा समावेश आहे. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच सुमारे 53,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,599 म्हणजेच सुमारे 57,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,899 म्हणजेच सुमारे 61,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 15 goes official in China! 🪶 8.1 mm thick, 211 grams weight (Sand Dune)
🖥️ 6.78″ FHD+ 10-bit OLED display, 1-165 Hz refresh rate, BOE X3 panel, PWM+DC dimming
💨 New Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 chip
🔋 7300 mAh battery
🔌 120W wired charging (PD/PPS support), 50W… pic.twitter.com/vxaQ1Rifzs — Alvin (@sondesix) October 27, 2025
OnePlus 15 च्या 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 5,399 म्हणजेच सुमारे 67,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅब्सोल्युट ब्लॅक, मिस्टी पर्पल आणि सँड ड्यून या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
OnePlus 15 मध्ये 6.78-इंच थर्ड जेनरेशन BOE Flexible AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. या स्मार्टफोनचे रेजोल्यूशन 1.5K (1,272×2,772 पिक्सेल), 1,800 निट्स पीक ब्राइटनेस, आणि टच सँपलिंग रेट 330Hz आहे. कंपनीने लाँच केलेला हा लेटेस्ट स्मार्टफोन Qualcomm च्या ऑक्टो-कोर 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 840 GPU देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, OnePlus 15 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे. ज्याचा अपर्चर f/1.8 आणि फोकल लेंथ 24mm आहे. यासोबतच 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देखील फोनमध्ये आहे. सेल्फीसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन रियर कॅमेरा सेटअप 8K रेजोल्यूशन व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
कनेक्टिविटीसाठी OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये 5जी, वाय-फाय 7, एनएफसी, बीडो, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस चा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 7,300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W सुपर फ्लॅश वायर्ड आणि 50W वायलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.






