आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण
OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…
कंपनीने लाँच केलेल्या नव्या वनप्लस बड्स एस 3 ची किंमत CNY 329 म्हणजेच सुमारे 4,600 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने त्यांचे नवीन ईअरबड्स स्टारक्राफ्ट ब्लॅक आणि टायटॅनियम स्पेस सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहेत. (फोटो सौजन्य – OnePlus)
नव्या ईयरबड्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, बड्स एस 3 मध्ये 12mm चा डायनामिक ड्राइवर देण्यात आला आहे. ईयरबड्स एलएचडीसी 5.0 ट्रांसमिशनसह हाय-रिस ऑडियोला देखील सपोर्ट करतात. एवढंच नाही तर या लेटेस्ट लाँच ईयरबड्समध्ये 96kHz पर्यंत सँपलिंग रेट आणि 1Mbps पर्यंत बिटरेट मिळणार आहे.
नव्या ईयरबड्समध्ये स्पेशल ऑडियो इफेक्ट आणि कस्टम ट्यूनिंगसाठी 10-बँड EQ देण्यात आला आहे. यामध्ये बासवेव डायनामिक बास एन्हांसमेंट फीचर देखील मिळणार आहे. नॉइज कंट्रोलसाठी ईयरबड्समध्ये 55dB पर्यंत अॅक्टिव नॉइज कँसलेशन देण्यात आले आहे.
वनप्लसने लाँच केलेल्या नव्या बड्स एस 3 मध्ये 5,000Hz चे अल्ट्रा-वाइडबँड कवरेज आणि रियल-टाइम एडॅप्टिव एल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच या ईअरबड्समध्ये फ्लॅगशिप-लेवलचे वॉयस नॉइज रिडक्शन सिस्टिम देखील देण्यात आले आहे. ईयरबड्समध्ये Sanmai AI कॉल नॉइज रिडक्शन देखील देण्यात आले आहे.






