Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय
Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर
विवोचे नवीन हँडसेट 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,800 म्हणजेच सुमारे 24,800 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,200 म्हणजेच सुमारे 30,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन कंपनीने सिल्व्हर, ऑब्सिडियन ब्लॅक आणि फिनिक्स गोल्ड कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ज्या यूजर्सना मोठी बॅटरी, दिर्घकाळ बॅकअप आणि मजबत डिझाईन पाहिजे आहे, असे यूजर्स हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, विवो वाय 500 एस डिव्हाईसमध्ये 6.75-इंच एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईस ऑक्टा-कोर सीपीयू आणि अॅड्रेनो 613 जीपीयूने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळत आहे.
यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी विवो वाय 500 एसमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. फोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे, जी 44W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.






