12,140mAh ची पावरफुल बॅटरी आणि 13-मेगापिक्सल कॅमेरा... OnePlus ने लाँच केला नवीन टॅब्लेट, जाणून घ्या किंमत
OnePlus ने मंगळवारी OnePlus Pad 2 Pro चीनच्या मार्केटमध्ये लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 13.2-इंच LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 3.4K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हे टॅब्लेट Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 12,140mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. हा टॅब्लेट एक गेमिंग-फोकस्ड डिव्हाईस आहे. यामध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी 34,857sq mm वेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन टॅब्लेटची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
OnePlus Pad 2 Pro चीनमध्ये 4 स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB, 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंट्सचा समावेश आहे. टॅब्लेटच्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 37,900 रुपयांपासून सुरु होते. 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 41,500 रुपये, 12GB + 512GB CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आणि 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,400 रुपये आहे. (फोटो सौजन्य: X)
हा नवीन टॅब्लेट डीप सी ब्लू आणि ग्लेशियर सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. टॅब्लेट सध्या चीनमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आणि 20 मेपासून सकाळी ऑफिशियल ई-स्टोर आणि निवडक ऑनलाइन रिटेल वेबसाइट्सवर याची विक्री सुरु होणार आहे.
OnePlus Pad 2 Pro launched in China.
Price 💰 ¥3199 (₹37,886, $444, €399)specifications
📱 13.2″ 3.4K 7:5 IPS LCD display
144Hz refresh rate, 900nits HBM
🔳 Qualcomm Snapdragon 8 Elite
LPDDR5x RAM & UFS 4.0 storage
🍭 Android 15 Color OS 15
📸 13MP rear camera
🤳 8MP front… pic.twitter.com/WyAL1lGAXZ— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 13, 2025
OnePlus Pad 2 Pro मध्ये 13.2-इंच 3.4K (2,400×3,392 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 315ppi पिक्सल डेंसिटी, 89.3 परसेंट स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 900 निट्स ब्राइटनेस आणि Dolby Vision सपोर्ट आहे. हे ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS4.0 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. टॅब्लेट अँड्रॉयड 15-बेस्ड ColorOS 15 सह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अधिका चांगल्या हीट डिसिपेशनसाठी 34,857sq mm कूलिंग सिस्टम आहे.
फोटोग्राफीसाठी OnePlus Pad 2 Pro मध्ये 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये इसमें सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 8-मेगापिक्सल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. टॅब्लेट निवडक गेम्ससाठी 2.1K रेजोल्यूशन इमेजेसला 120 फ्रेम्सवर सपोर्ट करू शकतो.
Moto ने उडवली सर्वांची झोप, बाजारात आणला प्रीमियम Foldable Smartphone! तब्बल इतकी आहे किंमत
OnePlus Pad 2 Pro मध्ये 12,140mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. हे अनेक AI फीचर्स आणि आठ स्पीकर यूनिट्सने सुसज्ज आहे.