विशलिस्ट तयार केली का? 'या' महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale... या यूजर्सना होणार मोठा फायदा
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर जुलै महिन्यात सेलचे आयोजन केले जाणार आहे. कंपनी जून महिन्यात ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, कंबोडिया, कोलंबिया, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, लक्झेंबर्ग, मेक्सिको, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्पेन, स्वीडन, तुर्की, यूएई, यूके आणि यूएस या देशांमध्ये अॅमेझॉन प्राइम डे सेलचे आयोजन करणार आहे. तर जुलै महिन्यात भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जपानमध्ये हा सेल आयोजित केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्यावर्षी देखील कंपनीने जुलै महिन्यात प्राईम डे सेलचे आयोजन केले होते. कंपनीने सांगितलं आहे की, गेल्यावर्षी 55 करोड प्रोडक्ट्स त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी डिलीव्हर केले होते. जी मागील वर्षाच्या तुलनेत 40% वाढ आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्सना अर्ध्याहून कमी किंमतीत अनेक प्रोडक्ट्स ऑफर करण्यात आले होते. प्राइम डे सेलमध्ये अॅमेझॉन प्राइम यूजर्सनाच खरेदीची संधी मिळते.
सेलमध्ये अॅमेझॉन पे, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे प्रोडक्ट खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर 1,399 रुपयांहून अधिक प्रोडक्ट खरीद केल्यास प्राइम मेंबर्सना एक्सक्लूसिव ऑफर देखील मिळणार आहेत. या सेलमध्ये 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत प्रोडक्ट खरेदी केल्यास ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याचा दावा केला जात आहे. तसेच प्राईम मेंबर्सना मोफत अनलिमिटेड प्रोडक्ट डिलीव्हर केले जाणार आहेत.
अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपबद्दल बोलायचं झालं तर, याचे शॉपिंग एडिशन प्लॅन 399 रुपयांपासून सुरु होतो. 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 12 महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप मिळणार आहे. तर अॅमेझॉन प्राईम लाईटसाठी 799 रुपये प्रति वर्षाला खर्च करावे लागणार आहेत. स्टँडर्ड प्राईम मेंबरशिपच्या वार्षिक प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे, तर मासिक प्लॅन्स दरमहा 299 रुपयांपासून सुरू होतात.






