ANC सपोर्ट आणि अॅक्टिव नॉइज कँसलेशनसह Oppo चे नवीन ईअरबड्स लाँच, किंमत 5 हजार रुपयांहून कमी
टेक कंपनी Oppo ने चीनमध्ये त्यांचे नवीन एअरबड्स Oppo Enco Free 4 लाँच केले आहेत. अनेक आपग्रेडेड फिचर्स आणि नवीन डिझाईनसह कंपनीने त्यांचे नवीन एअरबड्स लाँच केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाँच करण्यात आलेला हा कंपनीचा नवीनतम ट्रूली वायरलेस स्टीरिओ (TWS) हेडसेट आहे. यामध्ये असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हे एअरबड्स युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. कंपनीने लाँच केलेल्या या नवीनतम एअरबड्समध्ये 11 मिमी वूफर आणि 6 मिमी ट्विटरसह कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर सेटअप आहे. या नवीन डिव्हाईसची किंमत आणि त्याचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo Enco Free 4 ची किंमत CNY 400 म्हणजेच सुमारे 4,700 रुपये आहे आणि हेडसेट वॉटर ब्लू कलर पर्यायात उपलब्ध आहे. ग्राहक पर्यायी मॉडेल देखील निवडू शकतात ज्याची किंमत CNY 450 म्हणजेच अंदाजे 5,300 रुपये आहे आणि ती स्टार सिल्व्हर (डायनॉडिओ एडिशन) रंगात उपलब्ध आहे. कंपनीने चीनमध्ये Oppo Enco Free 4 साठी प्री-ऑर्डर सुरू केली आहे आणि हा हँडसेट 16 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Oppo Enco Free 4 हे एअरबड्स जागतिक बाजारात, भारतात किंवा इतर देशांमध्ये कधी लाँच बोलणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
नवीन Oppo Enco Free 4 मध्ये 11 मिमी वूफर आणि 6 मिमी ट्विटर आहे. कंपनीच्या मते, वायरलेस हेडसेटमध्ये ड्युअल डिजिटल ते अॅनालॉग कन्व्हर्टर (DAC) देखील आहेत. स्टार सिल्व्हर व्हेरियंट डायनॉडिओने ट्यून केला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Oppo Enco Free 4 मध्ये 55 डीबीपर्यंत एएनसी सपोर्ट आहे आणि प्रत्येक इअरफोनमध्ये तीन मायक्रोफोन आहेत, जे कॉलदरम्यान इतर आवाज कमी करण्यास मदत करतात. हा वायरलेस हेडसेट उच्च-रिझोल्यूशन ऑडिओ आणि तीन कोडेक्स – SBC, AAC आणि LHDC 5.0 ला सपोर्ट करतो. यात वैयक्तिक ट्यूनिंगसह स्थानिक ऑडिओ देखील आहे.
AAC कोडेक वापरात असताना, Oppo Enco Free 4 ANC चालू आणि बंद असताना अनुक्रमे 11 तास आणि 6 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकतो. तथापि, LHDC कोडेक चालू केल्यावर हे आकडे नऊ तास आणि 5.5 तासांच्या प्लेबॅकपर्यंत कमी होतात. चार्जिंग केस पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 1 तास 20 मिनिटे लागतात आणि बड्स 50 मिनिटांत चार्ज करता येतात.
Oppo Enco Free 4 मध्ये ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी आहे. हे एअरबड्स तुम्ही स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईससोबत कनेक्ट केल्यानंतर अतिरिक्त एआय वैशिष्ट्यांसाठी समर्थन देते. या वायरलेस हेडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP55 रेटिंग आहे आणि त्याचे माप 65.4×52.4×25.3 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 49 ग्रॅम (केस) आणि 4.73 ग्रॅम (इअरफोन) आहे.