Instagram वर आलं नवं फीचर, आता रिल पाहण्यासाठी टाकावा लागणार सीक्रेट कोड! युजर्सची मजा वाढणार की गोंधळ?
फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत असते. हे फीचर्स युजर्ससाठी कधी फायदेशीर ठरतात तर कधी त्रासदायक. अनेक इंस्टाग्राम फीचर आतापर्यंत रिलीज करण्यात आले होते, मात्र युजर्सच्या तक्रारीनंतर काही फीचर काढून टाकण्यात आले. नुकतेच कंपनीने रिल्स आणि पोस्टवरील नोट्स फीचर देखील काढून टाकलं आहे. यानंतर आता कंपनी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आता येणारं नवं फीचर युजर्ससाठी त्रासदायक ठरणार की फायदेशीर, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट
मेटा -मालकीचे इंस्टाग्राम लॉक्ड रील्स नावाच्या एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये काही रील्स पाहण्यासाठी एक सिक्रेट कोड प्रविष्ट करावा लागेल. हा कोड कॅप्शनमध्ये दिलेल्या पहिल्या हॅशटॅगमध्ये आढळू शकतो. जर तुम्ही योग्य कोड टाकलात तरच रील उघडेल. या वैशिष्ट्याची सध्या चाचणी सुरू आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी सुरु केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्यांदरम्यान, इंस्टाग्राम नवीन वैशिष्ट्ये जोडून अधिकाधिक लोकांना आकर्षित करू इच्छित असल्याचे मानले जाते. या नवीन फीचरमुळे, इंस्टाग्राम रील्स पाहणे मजेदार होईल आणि काही सस्पेन्स देखील राहील. अनेक कंपन्या नवीन प्रोडक्ट प्रदर्शित करण्यासाठी किंवा ऑफर देण्यासाठी याचा वापर करू शकतात. सामान्य लोक देखील त्यांच्या खास मित्रांसोबत अशा प्रकारे रील्स शेअर करू शकतील.
तुम्हाला कोड टाकून रील उघडावी लागेल, त्यामुळे त्यातील कंटेट सर्वांना उपलब्ध होणार नाही. यामुळे लोकांना काहीतरी खास आणि वैयक्तिक शेअर करण्यास मदत होईल. सध्या, इंस्टाग्रामने या फीचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. इंस्टाग्रामने यापूर्वी रिव्हल स्टिकरसारखे फीचर्स सादर केले आहेत, ज्यामध्ये मेसेज पाठवल्यानंतरच कंटेंट दिसतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रेम्स, ज्यामध्ये तुम्हाला फोटो पाहण्यासाठी फोन हलवावा लागतो. नवीन लॉक्ड रील्स वैशिष्ट्य विशिष्ट ग्राहकांसाठी किंवा स्थानांसाठी देखील वापरले जाऊ शकते. सर्व काही इंस्टाग्रामच्या पुढील घोषणेवर अवलंबून आहे.
आगामी फीचर युजर्ससाठी फायदेशीर आणि मजेदार ठरणार असं सांगितलं जात असतानाच आता असा देखील प्रश्व निर्माण होत आहे की या नवीन फीचरमुळे युजर्सची मजा वाढणार की गोंधळ? कारण आतापर्यंत आपण इंस्टाग्रामवर ज्या रिल्स पाहत आहोत, त्यासाठी आपल्याला कोणताही सीक्रेट कोड टाकण्याची गरज भासत नाही. मात्र या नवीन फीचरनंतर आपल्याला काही निवडक रिल्स पाहण्यासाठी सीक्रेट कोड टाकावा लागणार आहे. मात्र हा सिक्रेट कोड शोधण हे सर्वात मोठं टास्क असणार आहे.
असे अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत, ज्यांची रिल्स पाहायला आपल्याला आवडतं. पण जर हे नवीन फीचर सुरु करण्यात आलं तर आपल्याला आवडत्या क्रिएटर्सच्या रिल्स पाहण्यासाठी देखील सिक्रेट कोडची गरज भासू शकते. हा सीक्रेट कोड शोधताना बराच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.