Samsung Smartphone: Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G ची भारतात विक्री सुरु, असा घ्या आकर्षक ऑफर्सचा लाभ
भारतातील लोकप्रिय कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आज त्यांच्या ‘मॉन्स्टर’ डिव्हासेस, Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G च्या विक्रीची घोषणा केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन लोकप्रिय Galaxy M सिरीजचे नवीन मॉडेल्स आहेत. जे शैली आणि आधुनिक नवकल्पना यांचं उत्तम कॉम्बिनेशन प्रदान करतात.
Galaxy M16 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, तो उच्च दर्जाचा कलर कॉन्ट्रास्ट ऑफर करतो. यामुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव खूप चांगला होतो. Galaxy M06 5G मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया पाहणे आणि अगदी तेजस्वी सूर्यप्रकाशातही वाचणे सोपे होते. हे खास Gen Z आणि Millennials साठी डिझाइन केलेले स्मार्टफोन्स आहे.
Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G दोन्ही नवीन डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये कॅमेरे एका सरळ रेषेत देण्यात आले आहेत. स्मार्टफोनचा रंग आकर्षक आहेत आणि फिनिशिंग देखील चांगली आहे, हे खूप ट्रेंडी स्मार्टफोन आहेत. दोन्ही स्मार्टफोन स्लीक आणि कॅरी करण्यासाठी आरामदायी आहेत. Galaxy M16 5G फक्त 7.9mm पातळ आहे आणि Galaxy M06 5G 8mm पातळ आहे.
इंटरनेटचं जग बदलणार? Google वेब ब्राउझर Chrome विकणार का? जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स
Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G हे MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत, जे फोनला खूप वेगवान बनवते आणि कमी बॅटरी वापरते. हे मल्टीटास्किंग सुलभ करते. दोन्ही स्मार्टफोन्स उत्कृष्ट वेग आणि कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट अग्रणी 5G बँडद्वारे समर्थित आहे. हे युजर्सना दिवसभर कनेक्टेड राहण्याची परवानगी देते. उच्च वेगाने व्हिडिओ डाउनलोड करणे आणि अपलोड करणे, कंटेंट स्ट्रीम करणे आणि कोणत्याही अंतराशिवाय इंटरनेटवर प्रवेश करणे, यासांरखी कामं युजर्स अगदी सहजपणे करू शकतात.
Galaxy M16 5G मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो आश्चर्यकारक स्पष्टता प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या 13MP फ्रंट कॅमेऱ्याने तुम्ही स्पष्ट आणि उत्तम सेल्फी घेऊ शकता.Galaxy M06 5G मध्ये उच्च-रिझोल्यूशन 50MP वाइड-एंगल लेन्स आहे, ज्यामध्ये F1.8 अपर्चर आहे. हे छान आणि तपशीलवार फोटो घेण्यासाठी मदत करते. 2MP डेप्थ कॅमेरा फोटोग्राफीची मजा आणखी वाढवतो. याव्यतिरिक्त, Galaxy M06 5G मध्ये सेल्फी काढण्यासाठी 8MP फ्रंट कॅमेरा येतो.
Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G या दोन्हींमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी इंटरनेट वापरण्यासाठी, गेम खेळण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक तास पुरेशी आहे. दोन्ही फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात, जे कमी वेळेत जास्त बॅटरी चार्ज करतात.
ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी Samsung Galaxy M16 5G सह 6 पिढीचे OS अपग्रेड आणि 6 वर्षांची सुरक्षा अपडेट देत आहे. Galaxy M06 5G 4 पिढ्या OS अपग्रेड आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेटसह येईल. प्रथमच, Galaxy M16 5G सॅमसंग वॉलेटसह ‘टॅप आणि पे’ वैशिष्ट्यासह येतो, ज्यामुळे सुरक्षित पेमेंट करणे सोपे होते. दोन्ही फोन सॅमसंगच्या सर्वात प्रगत सुरक्षा प्रणाली, Samsung Knox Vault सह लाँच करण्यात आले आहेत. Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G मध्ये ‘व्हॉईस फोकस’ सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत, जी कॉल दरम्यान आसपासचा आवाज कमी करते, संभाषण स्पष्ट करते.
Samsung Galaxy M16 5G सह 6 तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंंमत 11499 रुपये, 6GB+128GB व्हेरिअंटची किंंमत 12999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंंमत 14499 रुपये आहे. स्मार्टफोन ब्लश पिंक, मिंट ग्रीन, थंडर ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 1000 रुपयांचं कॅशबॅक ऑफर करत आहे.
Galaxy M06 5G 4GB+128GB आणि 6GB+128GB हा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंंमत 9499 रुपये आणि 6GB+128GB व्हेरिअंटची किंंमत 10999 रुपये आहे. हा स्मार्टफोन सेज ग्रीन ब्लेजिंग ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 500 रुपयांचे बँक कॅशबॅक आफॅर केले जात आहे.