रिअलमीने लॉंच केला नवीन फोन (फोटो- realme )
Realme ने लॉंच केला P4x हा जबरदस्त स्मार्टफोन
7000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार
45 वॅट क्षमतेचा चार्जिंग सपोर्ट मिळणार
देशभरातील अनेक मोबाइल कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉंच करत असतात. भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉंच होतात. दरम्यान लोकपिय कंपनी असणाऱ्या रिअलमी (Realme) कंपनीने नुकताच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत.
realme ने लॉंच केला P4x हा स्मार्टफोन
रिअलमी कंपनीने पी सिरिजमधील P4x हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये 7000 mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 45 वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. हा फोन 5 जी चिपसेट युक्त असणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, ते जाणून घेऊयात. P4x या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा fhd+ डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 144 z रिफरेश रेट असणार आहे. हा स्मार्टफोन अँन्ड्रॉईड 15 बेस वर आधारित असणार आहे. मोबाईलचे वजन साधारणतः 208 ग्रॅम इतके आहे.
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी एआय कॅमेरा आणि दूसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा असणार आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ब्लुटुथ, यूएसबी आणि अन्य फीचर्स देखील मिळणार आहेत.
BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा, 30 दिवसांची Validity, रोमिंगदेखील मोफत
काय असणार किंमत?
Realme P4x या स्मार्टफोनच्या 6/128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 15,499 रुपये आहे. तर 8/128 जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रुपये असणार आहे. तर 8/256 जीबी स्टोरेजची किंमत 17,999 रुपये असणार आहे. हा फोन तुम्हाला रिअलमीची वेबसाईट, रिटेल स्टोअर्स, ऑनलाइन वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा
ग्राहकांच्या प्रचंड मागणीनंतर भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांचा लोकप्रिय १ रुपयाचा फ्रीडम प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये फक्त १ रुपयाला ३० दिवस मोफत कॉलिंग आणि डेटा मिळतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करताना लिहिले आहे की, “आता, फक्त १ रुपयाला, तुम्हाला खरे डिजिटल स्वातंत्र्य मिळेल.” तसेच जनतेच्या प्रचंड मागणीमुळे हा प्लॅन पुन्हा लाँच केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. १ रुपयाच्या फ्रीडम प्लॅनमध्ये काय फायदे मिळतात आणि कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया. १ रुपयांचा हा अद्भुत प्लॅन देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. तथापि, हा फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे.






