6000mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 5G लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी; असे आहेत फीचर्स
Realme ने आज 16 जून रोजी त्यांचा नवीन Realme Narzo 80 Lite 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.पावरफुल प्रोसेसर, पावरफुल बॅटरी आणि उत्तम फीचर्ससह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी आहे, त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. हा नवीन स्मार्टफोन Realme Narzo 80x आणि Narzo 80 Pro नंतर लाँच करण्यात आला आहे. हे स्मार्टफोन कंपनीने एप्रिल महिन्यात लाँच केले होते. या आता सिरीजमध्ये आणखी एका नवीन डिव्हाईसचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Tech Tips: अरेरे! स्मार्टफोनमधून फोटो झाले डिलीट? काळजी करण्याची गरज नाही, या टीप्स करणार तुमची मदत
Realme Narzo 80 Lite 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 10,499 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत11,499 रुपये आहे. फोन क्रिस्टल पर्पल आणि ऑनिक्स ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री 23 जूनपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन काही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 4GB + 128GB व्हेरिअंटसाठी 9,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी 10,799 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
realme NARZO 80 Lite launched in India for a starting price of ₹9999
– 6000mAh battery
– MediaTek Dimensity 6300
– IP64 rating
– 32MP main camera
– 120Hz display
– Crystal Purple, Onyx Black color variants
– Armorshell, Military-Grade Shock Resistance
– 7.94mm, 197g
– realme UI… pic.twitter.com/SYdwdtM8D9— Mukul Sharma (@stufflistings) June 16, 2025
Realme Narzo 80 Lite 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 625 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिव्हाईस ऑक्टा-कोर मीडियाटेक 6300 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. डिव्हाईस Android 15-बेस्ड Realme UI 6.0 वर चालते. Google Gemini इंटीग्रेशन देखील ऑफर करते.
या डिव्हाईसमध्ये ऑटोफोकस सपोर्टसह 32-मेगापिक्सेलचा GC32E2 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये पिल-आकाराचा एलईडी फ्लॅश दिसतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये एआय इमेजिंग आणि एआय क्लिअर फेस सारखे एडिटिंग फीचर्स देखील आहेत.
विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?
फोनमध्ये मोठी 6,000mAh बॅटरी देखील आहे जी 15W वायर्ड आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग देते. या किमतीत, हा फोन ड्युअल 5G सिम कनेक्टिव्हिटी देत आहे.