विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?
अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात कसा झाला आणि त्याचं कारण काय आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. विमानातून प्रवास करताना वैमानिक आणि क्रू मेंबर्ससोबतच प्रवाशांनी देखील काही नियमाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
अनेकदा लोकं कोणतीही माहिती आणि नियम लक्षात न घेता विमानात असे काही इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज घेऊन जातात, ज्यामुळे विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला अशा काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत, जे विमान प्रवासादरम्यान घेऊन जाण्यास मनाई आहे. या गॅझेट्सचा विमान प्रवासादरम्यान वापर केल्यास विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. चला तर मग या डिव्हाईसबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
पॉवर बँक आज प्रत्येकाची गरज बनला आहे. कुठेही फिरायला जाताना पॉवर बँक घेऊन जाणं, सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक घेऊन जाण्यास एक लिमिट असते. जर तुमची पॉवर बँक 27000 mAh हून अधिक क्षमतेची असेल, तर यामुळे विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विमान प्रवासात 10000 mAh किंवा 20000 mAh पर्यंतचे पॉवर बँक नेण्यास परवानगी आहे.
ई-सिगरेट आणि वेपिंग डिवाइसेज विमानात घेऊन जाण्यास मनाई आहे. यामध्ये लिक्विड निकोटिनसह लिथियम बॅटरी असते, ज्यामुळे तापमान वाढून आग लागू शकते. फ्लाईटमध्ये या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे.
हल्ली बाजारात अशा काही स्मार्ट बॅग्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चार्जिंग पोर्ट, जीपीएस आणि वजन मापणं यासारख्या स्मार्ट सुविधा असतात. परंतु जर त्यामध्ये बसवलेली लिथियम बॅटरी काढता येत नसेल, तर अशा बॅगा विमानातून घेऊन जाण्यास मनाई आहे. कारण बॅग्स कार्गोमध्ये ठेवल्या गेल्या आणि बॅटरीमध्ये काही गडबड झाली तर मोठा अपघात होऊ शकतो.
Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
आपण अनेकदा अशा गॅझेट्सचा वापर करत असतो ज्यामध्ये छोटी पण हाय-पावर बॅटरी असते. जसं की, काही कॅमेरा, ड्रोन्स, किंवा हँडहीटर्स. असे गॅझेट्स विमानतळावर नेल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.