जगातील टॉप Smart TV ब्रँड, LG ला टाकले मागे, पाहा डिटेल्स
मुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सलग २० वर्षांपासून जगातील क्रमांक एक टीव्ही ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. गेल्या दोन दशकांपासून सॅमसंगने जागतिक टेलिव्हिजन उद्योगात सातत्याने आघाडी राखली असून, नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
बाजारपेठ संशोधन संस्था ओम्डिया यांच्या अहवालानुसार, सॅमसंगने २००६ पासून जागतिक टीव्ही बाजारपेठेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. २०२५ मध्ये कंपनीने जागतिक टीव्ही बाजारपेठेत २९.१ टक्के हिस्सा नोंदवत आपले नेतृत्व अधिक बळकट केले. या उल्लेखनीय यशामुळे प्रीमियम, अतिशय मोठ्या स्क्रीन असलेल्या आणि नेक्स्ट-जनरेशन डिस्प्ले तंत्रज्ञानावर आधारित टेलिव्हिजन श्रेणींमध्ये सॅमसंगचे स्थान अधिक दृढ झाले आहे.
प्रीमियम टीव्ही विभागातही सॅमसंगने भक्कम कामगिरी नोंदवली आहे. निओ क्यूएलईडी, ओएलईडी आणि लाइफस्टाइल टेलिव्हिजनच्या माध्यमातून २,५०० डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या श्रेणीत कंपनीने ५४.३ टक्के बाजारपेठ हिस्सा मिळवत आघाडी कायम ठेवली. तसेच १,५०० डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या श्रेणीतही सॅमसंगने ५२.२ टक्के बाजारपेठ हिस्स्यासह आपले नेतृत्व टिकवून ठेवले.
याबाबत बोलताना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या व्हिज्युअल डिस्प्ले (व्हीडी) व्यवसायाचे अध्यक्ष व प्रमुख एस. डब्ल्यू. योंग म्हणाले, “ग्राहक टीव्हीची निवड करताना दीर्घकालीन विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता देणाऱ्या ब्रँडला प्राधान्य देतात. जागतिक टीव्ही बाजारपेठेत सलग २० वर्षे मिळवलेले आमचे नेतृत्व हे त्या विश्वासाचेच प्रतीक आहे. दोन दशकांपासून अभियांत्रिकी उत्कृष्टता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम नवकल्पनांवर आधारित आमचा हा प्रवास पुढेही कायम राहील.”
टेलिव्हिजन उद्योगाला नव्या उंचीवर नेणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रवासात सॅमसंगने गेल्या दोन दशकांत सातत्याने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. २००६ मध्ये डिझाइन-केंद्रित बोर्डोक्स टीव्ही सादर करून कंपनीने जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आणि टीव्ही डिझाइनमध्ये नवे मानक निर्माण केले. त्यानंतर २००९ मध्ये सॅमसंगने एलईडी टीव्ही सादर करून अतिशय स्लिम आणि ऊर्जा-कार्यक्षम डिस्प्लेची नवी दिशा दाखवत जागतिक स्तरावर एलईडी टीव्हीकडे संक्रमणाला गती दिली. २०११ मध्ये स्मार्ट टीव्हीच्या लाँचमुळे पारंपरिक टेलिव्हिजनचे रूपांतर कनेक्टेड एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्ममध्ये झाले आणि प्रेक्षकांच्या पाहण्याच्या अनुभवाला नवे परिमाण मिळाले.
२०१५ मध्ये सादर झालेल्या द सेरिफ या डिझाइन-केंद्रित टीव्हीने टेलिव्हिजनला केवळ स्क्रीन न ठेवता घरातील सजावटीचा एक आकर्षक भाग म्हणून स्थापित केले. पुढे २०१७ मध्ये सॅमसंगने द फ्रेम लाँच करत टेलिव्हिजनला सानुकूल डिजिटल आर्ट कॅनव्हासमध्ये रूपांतरित केले आणि आर्ट टीव्ही श्रेणीला नवे नेतृत्व दिले. त्याच वर्षी कंपनीने क्वांटम डॉट तंत्रज्ञानावर आधारित क्यूएलईडी टीव्ही सादर करत प्रीमियम पिक्चर क्वालिटीच्या क्षेत्रात उद्योगासाठी नवे मापदंड निर्माण केले. २०१८ मध्ये ३३ दशलक्षहून अधिक पिक्सेल असलेले ८के टीव्ही सादर झाले, ज्यांचे रिझोल्यूशन ४केपेक्षा चारपट अधिक होते. त्यानंतर २०२० मध्ये सॅमसंगने मायक्रो एलईडी तंत्रज्ञान सादर करत सेल्फ-इमिसिव्ह डिस्प्लेच्या नव्या युगाची सुरुवात केली आणि अतिशय मोठ्या स्क्रीनमध्ये अधिक ब्राइटनेस, उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट आणि अचूक रंगसंगतीसाठी नवे मानक निर्माण केले.
नाविन्यतेचा आपला वारसा अधिक दृढ करत सॅमसंग विस्तारित मायक्रो आरजीबी मॉडेल्ससह आपल्या प्रीमियम टीव्ही पोर्टफोलिओला अधिक सर्वसमावेशक करत आहेत, तसेच आपल्या नेक्स्ट-जनरेशन डिस्प्ले तंत्रज्ञानांना प्रगत करत आहे आणि उच्च-कार्यक्षम स्क्रिन्समधील नेतृत्व दृढ करत आहे. कंपनी आपली ओएलईडी व निओ क्यूएलईडी लाइनअप्स देखील वाढवत आहे, तसेच प्रीमियम पिक्चर क्वॉलिटी, अत्यंत मोठ्या आकारचे स्क्रिन पर्याय आणि वैविध्यपूर्ण डिस्प्ले कार्यक्षमता देत आहे.
सॅमसंग आपल्या मिनी एलईडी ऑफरिंग्ज देखील वाढवत आहे, मोठ्या स्क्रिन आकारांमध्ये व किमतीच्या श्रेणींमध्ये सुधारित ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट व अचूक नियंत्रण देत आहे, ज्यासह आपल्या लाइनअपमध्ये प्रगत डिस्प्ले कार्यक्षमता वाढवत आहे. याव्यतिरिक्त, एआय-समर्थित टीव्हींमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करत प्रगत प्रोसेसर्स व सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश करत आहे, जे रिअल टाइममध्ये पिक्चर, साऊंड व वैयक्तिककरण अधिक सानुकूल करतात. दोन दशकांच्या प्रमाणित जागतिक नेतृत्वासह सॅमसंग जगभरात सर्वात सातत्यपूर्ण मान्यताकृत व विश्वसनीय टीव्ही ब्रँड आहे, जो विविध किंमत श्रेणी, स्क्रिन आकार व डिस्प्ले नाविन्यतांमध्ये उद्योग-अग्रणी तंत्रज्ञान देतो.






