DC Vs RCB Playing 11 (फोटो- ians)
विराट कोहली विरुद्ध कुलदीप यादव आमनेसामने
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
दिल्लीसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा
Tata IPL DC Vs RCB Live Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आज आयपीएलचा रणसंग्राम सुरू होऊन एक महिना झाला आहे. आज अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना होणार आहे. पीच रिपोर्टसोबत आज आपण दोन्ही संघांच्या खेळाडू आणि हेड टू हेड रेकॉर्डबद्दल (IPL 2o26) जाणून घेणार आहोत. सध्या आरसीबीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार सध्या गोलंदाजी चांगली करत आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 13 सामने जिंकली आहे. याच हंगामात 18 एप्रिल रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या दोन संघांची पहिली गाठ पडली होती. त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अत्यंत अटीतटीच्या लढतीत आरसीबीचा 6 खेळाडू राखून पराभव केला होता. विशेष म्हणजे, शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सने दिल्लीला विजय मिळवून दिला होता.
DC Vs RCB Pitch Report: 264 कमी पडणार की…; दिल्ली विरुद्ध आरसीबी, आजचा पीच रिपोर्ट काय?
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. सीमारेषा लहान असल्याने फलंदाजांना येथे थोडी अधिक मदत मिळते. मागच्या सामन्यात या स्टेडियमवर 400 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे आपण पाहिलेच होते.
रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते, परिणामी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काही षटकांत थोडी मदत मिळू शकते. सामना पुढे जाईल तसा खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. मध्य ओव्हर्समध्ये स्पिनर्स कमाल दाखवू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल.






