आंबा प्रेमींसाठी खास पदार्थ! कडक उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार मँगो लस्सी, लहान मुलांसह मोठे करतील कौतुक
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण हापूस आंब्याची होते. हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. पिकलेल्या हापूस आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. आंब्याचा रायता, सासव, ज्यूस, आमरस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्यांपासून थंडगार लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली आंब्याची लस्सी चवीसोबतच शरीरसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच कोल्ड्रिंक पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे हापूस आंब्याचा गोड सुगंध आणि दह्याचा वापर करून बनवलेली लस्सी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. आंब्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया मँगो लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






