Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट
स्मार्टफोन आणि दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या Samsung ने त्यांच्या डिव्हाईससाठी One UI 7 अपडेट अखेर जारी केलं आहे. 7 एप्रिल रोजी हे अपडेट जारी करण्यात आलं आहे. या अपडेटमुळे सॅमसंग युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. कारण या अपडेटमुळे सॅमसंगच्या गॅलेक्सी फोन आणि टॅब्लेटमध्ये नवीन फीचर्स, सुधारित व्हिज्युअल्स आणि AI एआई-बेस्ड टूल्सचा समावेश केला जाणार आहे.
रिलीज करण्यात आलेलं नवीन अपडेट अँड्रॉइड 15 बेस्ड आहे आणि हे अपडेट काही निवडक युजर्ससाठी मार्चमध्ये बीटा आवृत्ती म्हणून उपलब्ध होते. आता या अपडेटचे स्टेबल वर्जन गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या अधिक डिव्हाईसाठी रिलीज करण्यात आलं आहे. याची सुरुवात गॅलेक्सी S24 आणि Z सिरीजपासून करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
AI सिलेक्ट: युजर्स एज पॅनल स्वाइप करून व्हिडिओ GIF म्हणून सेव्ह करू शकतात.
ऑडिओ इरेजर: व्हिडिओमधून अवांछित पार्श्वभूमी आवाज काढून टाकतो.
लेखन सहाय्य: संदेश आणि डाक्यूमेंट्समधील मजकूर फॉर्मेट करण्यास आणि सारांशित करण्यास मदत करते.
नाऊ बार: हे लॉक स्क्रीनच्या तळाशी असलेल्या काही अॅप्ससाठी रिअल-टाइम अपडेट्स देते.
गुगल जेमिनी इंटिग्रेशन: युजर्स नैसर्गिक भाषेतील व्हॉइस कमांड वापरून त्यांचे डिव्हाइस शोधू शकतात, नेव्हिगेट करू शकतात आणि नियंत्रित करू शकतात.
सॅमसंगने अलीकडेच जगभरातील अनेक प्रदेशांसाठी One UI 7 अपडेट टाइमलाइन शेअर केली आहे . या अपडेटचे रोलआउट 7 एप्रिलपासून सुरू झाले आहे. 7 एप्रिल रोजी काही निवडक डिव्हाईससाठी हे अपडेट जारी करण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अधिकृत One UI 7 अपडेट 7 एप्रिल रोजी अमेरिकेत Galaxy S24 सिरीज, Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 साठी लाँच केले जाईल. आता हे अपडेट कोणत्या प्रदेशात कोणत्या डिव्हाईससाठी जारी केलं जाणार आहे, त्याची यादी पाहूया.
दक्षिण कोरियामध्ये हे अपडेट 7 एप्रिल रोजी जारी करण्यात आलं. अमेरिका, कनाडा, नॉर्वे, स्वीडनमध्ये हे अपडेट 10 एप्रिल रोजी जारी केलं जाणार आहे आणि मलेशिया, सिंगापुरमध्ये हे अपडेट 14 रोजी जारी केलं जाणार आहे.