हा आहे Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन! 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतो OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस, इतकी आहे किंमत
रिलायन्स जिओ भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे भारतात कोट्यावधी युजर्स आहे. त्यामुळे आपल्या युजर्सच्या फायद्यासाठी आणि नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करत असते. या प्लॅन्समध्ये अनेक ऑफर देखील दिल्या जातात. ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि हाय-स्पीड डेटा सारखे फायदे समाविष्ट असतात. इतकंच नाही तर कंपनी त्यांच्या युजर्सना ओटीटी प्लटफॉर्मचा फ्री अॅक्सेस देखील ऑफर करत असते.
Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू… वाचा सविस्तर
कंपनीच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. शिवाय त्याची किंमत देखील सर्व सामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळे तुम्ही जिओचा फायदेशीर आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजकाल, लोक पारंपारिक टीव्हीपासून दूर जात आहेत आणि ZEE5, SonyLiv, Netflix आणि Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार कंटेट पाहू शकता. युजर्सची हीच गरज लक्षात घेऊन, जिओने काही खास रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत, जे या ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतात. म्हणजेच जिओचा हा रिचार्ज प्लॅन ऑल इन वन आहे. येथे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1,049 रुपये आहे. जर तुम्हाला मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर जिओचा 1,049 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या सर्व सुविधा ऑफर केल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये सोनीलिव्ह आणि ZEE5 वर मोफत प्रवेश (जियोटीव्ही अॅपद्वारे) देखील दिला जातो. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांचे जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन दिले जाते. जर तुम्हाला कमी किमतीत उत्तम 5G इंटरनेट, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत ओटीटी अॅक्सेस हवा असेल, तर जिओचा 1,049 रुपयांचा प्लॅन हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल, डेटा, मनोरंजन आणि बचत देखील होईल.
या प्लॅनचा एक मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही संपूर्ण प्लॅनची किंमत पाहिली तर, सोनीलिव्ह सबस्क्रिप्शन सुमारे 12 रुपये प्रतिदिन या किमतीत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला इतक्या कमी किमतीत उत्तम शो, वेब सिरीज आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्याची संधी मिळेल.पूर्वी, JioHotstar चा मोफत प्रवेश फक्त 31 मार्च 2025 पर्यंत होता, परंतु आता तो 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा अर्थ आता तुमच्याकडे हा फायदा घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी आहे.