फोटो सौजन्य: Social Media
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलॅक्सी एस२४ एफईच्या लाँचची घोषणा केली. अधिकाधिक वापरकर्त्यांना प्रीमियम मोबाईल अनुभव देणाऱ्या गॅलॅक्सी एआय इकोसिस्टममध्ये या नवीन स्मार्टफोनची भर करण्यात आली आहे.
एआय-आधारित प्रोव्हिज्युअल इंजिनची शक्ती आणि गॅलॅक्सी एआयचे फोटो असिस्ट फीचर्स असलेल्या गॅलॅक्सी एस24 एफईमध्ये सुधारित कॅमेरा सेटअप आहे, जे वापरकर्त्यांना अधिक क्रिएटिव्ह फोटोग्राफी करण्यास सक्षम करते. हा चालता-फिरता गेमिंगचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण डिव्हाइस आहे.
हे देखील वाचा: रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp वरही घेता येणार, Meta AI करणार तुमची मदत
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच डायनॅमिक एएमओएलईडी 2X डिस्प्ले, दीर्घकाळपर्यंत टिकणारी 4700 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि शक्तिशाली एक्झिनॉस 2400 सिरीज चिपसेट आहे. गॅलॅक्सी एस24 एफईमध्ये उत्पादकता व सर्जनशीलता वाढवण्यासाठी प्रीमियम गॅलॅक्सी एआय टूल्स आणि इकोसिस्टम कनेक्टीव्हीटी आहे, जे आयकॉनिक डिझाइनमध्ये समाविष्ट आहे. तसेच हा मोबाईल शक्तिशाली सॅमसंग नॉक्स सिक्युरिटीद्वारे सुरक्षित आहेत.
गॅलॅक्सी एस२४ एफईच्या प्रीमियम कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल वाइड लेन्स आणि 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्ससह 3x ऑप्टिकल झूम आहे, ज्यांना ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (ओआयएस)चे पाठबळ आहे. तसेच 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
एफई सिरीजमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रोव्हिज्युअल इंजिनमध्ये व्यापक सुधारित तंत्रज्ञान आहे, जे ऍडव्हान्स एआय अल्गोरिदम्सचा फायदा घेत उल्लेखनीय सुस्पष्टता आणि सर्वोत्तम टेक्स्चर्स देते.
गॅलॅक्सी एस24 एफईमध्ये गॅलॅक्सी एस24 सिरीजप्रमाणेच प्रगत एआय अनुभवाचा समावेश आहे. कामामध्ये सुधारणा करण्यसाठी, आणि कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले एस24 एफईवरील गॅलॅक्सी एआय टूल्स देते, जे नवीन शक्यतांना अनलॉक करते.
किंमत किती?
हा फोन ब्ल्यू, ग्रॅफाइट आणि मिंट कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा दोन मेमरी स्टोरेज आणि रॅममध्ये उपलब्ध आहे. यात 8 जीबी + 128 जीबी फोनची किंमत 60 हजार रुपये आहे तर 8 जीबी + 256 जीबी फोनची किंमत 66 हजार आहे.