काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
आता राडा तर होणारच! सॅमसंग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सॅमसंग लवकरच जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स सोशल मीडियावर लिक झाले आहे. खरं तर कंपनीने अलीकडेच त्यांचा नवीन स्लिम Galaxy S25 Edge स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा स्लिम स्मार्टफोन आहे. मात्र लवकरच लाँच केला जाणारा Samsung Galaxy S26 Edge हा स्मार्टफोन Galaxy S25 Edge पेक्षा स्लिम असणार आहे, असं सांगितलं जात आहे.
टिप्स्टर Ice Universe ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 Edge पेक्षाही आगामी स्मार्टफोन पातळ असणार आहे. लिक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 Edge मध्ये उत्कृष्ट परफॉर्मंससोबतच मोठी बॅटरी देखील दिली जाणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला कंपनी हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन नक्की कधी लाँच होणार किंवा त्यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स दिले जाणार आहेत, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती अद्याप अधिकृतपणे शेअर केलेली नाही. मात्र या स्मार्टफोनचे लिक्स सतत समोर येत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
लीक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 Edge ची जाडी 5.5 मिमी असणार आहे, जी S25 Edge च्या 5.8 मिमीहून 0.3 मिमी कमी आहे. जर ही जाडी योग्य असेल तर आगामी स्मार्टफोन जगातील आतापर्यंतचा सर्वात स्लिम 5G फोन असणार आहे. या आगामी फोनमध्ये 4,200mAh कार्बन-सिलिकॉन बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. S25 Edge मध्ये 3,900mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी स्मार्टफोनची बॅटरी ही सर्वात मोठी अपग्रेड असणार आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही.
By the way, at this thickness, the battery capacity has reached the limit of silicon-carbon negative electrode batteries. In other words, even other brands can only reach this level at this thickness. https://t.co/ChBKr7ABXc
— PhoneArt (@UniverseIce) August 6, 2025
Geekbench वर मॉडल नंबर “SM-S947U” सह एक स्मार्टफोन दिसला आहे. हा स्मार्टफोन Galaxy S26 Edge असू शकतो, अशी शक्यता आहे. लिस्टिंगनुसार, या स्मार्टफोनमध्ये नवीन Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा प्रोसेसर 3.63GHz च्या बेस स्पीडसह येणार आहे आणि हाय-परफॉर्मंस टास्कसाठी दो कोर 4.74GHz पर्यंत स्पीड देणार आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग अधिक स्मूद होणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड लेंस दिला जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 सीरीजच्या Ultra आणि Edge मॉडलमध्ये 10.7Gbps LPDDR5X रॅम दिली जाऊ शकते.
Galaxy S26 Edge ची किंमत भारतात सुमारे 1 लाख रुपये असू शकते. स्लिम डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, अपग्रेडेड कॅमेरा आणि मोठी बॅटरी यामुळे हा फोन प्रीमियम मार्केटमध्ये एक नवीन स्टँडर्ड सेट करू शकतो.