हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
POCO ने अलीकडेच एक स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन POCO C75 5G या नावाने लाँच करण्यात आला होता. हा एक बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर ऑफर्स मिळणार आहेत. हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.
ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
POCO C75 5G वर एक जबरदस्त डिल ऑफर केली जात आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर तुम्हाला हा स्मार्टफोन 6,199 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही बँकिंग ऑफरशिवाय तुम्ही हा स्मार्टफोन 7,699 रुपयांना खरेदी करू शकता. या ऑफर्स आणि डिस्काऊंटबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
POCO C75 5G फोन 10,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर आता हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. POCO C75 5G वरील प्लॅट डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 7,699 रुपये झाली आहे. तर बँक ऑफर्ससह या फोनची किंमत आणखी कमी झाली आहे. कंपनी या फोनवर एक खास बँक ऑफर देखील देत आहे जिथे तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने 1500 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, त्यानंतर फोनची किंमत फक्त 6,199 रुपये होईल.
याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात चांगली किंमत मिळू शकते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच लक्षात ठेवा की ही एक्सचेंज व्हॅल्यू पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. बँक आणि एक्सचेंज ऑफरनंतर, तुम्ही 6 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकता.
POCO C75 5G च्या खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया. POCO C75 5G च्या या डिव्हाईसमध्ये 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे तुम्ही 1 TB पर्यंत SD वाढवू शकता. कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन खूप चांगला आहे जिथे 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, हे डिव्हाइस 5160mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 5G प्रोसेसरसह येते.
POCO C75 5G ची लाँच किंमत किती आहे?
10,999 रुपये
POCO C75 5G चे बॅटरी स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
5160mAh बॅटरी
POCO C75 5G मध्ये कोणता प्रोसेसर आहे?
स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 5G प्रोसेसर