Samsung AI Washer Dryer (Photo Credit- X)
सॅमसंग, भारतातील एक अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, यांनी आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी खास डिझाइन केलेला नवीन बिस्पोक एआय वॉशर ड्रायर (12 किग्रॅ वॉश / 7 किग्रॅ ड्राय) लाँच केला आहे. हा नवीन कॉम्बो, ‘नो लोड ट्रान्सफर’, ‘ऑल-वेदर लाँड्री’ आणि ‘इंटेलिजेंट फॅब्रिक केअर’ यांसारख्या सुविधा एकाच युनिटमध्ये देतो, ज्यामुळे मोठ्या कुटुंबांसाठी आणि शहरी घरांसाठी जागेची बचत करणारा एक उत्तम पर्याय ठरतो.
सॅमसंग इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, वॉशर ड्रायरची मागणी वाढत आहे. कारण, कुटुंबं आता धुळ आणि जंतूंपासून कपड्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात आणि कपडे सुकवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत करू इच्छितात. विशेषतः जास्त कपडे धुणाऱ्या आणि मर्यादित जागा असलेल्या कुटुंबांमध्ये अशा उपकरणांची जास्त गरज आहे. सॅमसंगची नवीन बिस्पोक एआय वॉशर ड्रायर श्रेणी या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली आहे, जी ‘इझी, सेव्ह आणि केअर’ या तीन मूल्यांवर आधारित आहे.
हे देखील वाचा: Samsung ने लाँच केला ‘Galaxy A17 5G’! जाणून घ्या AI फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले, “आमची ही नवीन श्रेणी आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ती सोयीसुविधा आणि स्वच्छता दोन्ही प्रदान करते. मला विश्वास आहे की हे उपकरण भारतीय कुटुंबांची कपडे धुण्याची पद्धत अधिक सोपी, जलद आणि विश्वसनीय बनवेल.”
सॅमसंगचा नवीन बिस्पोक एआय वॉशर ड्रायर Samsung.com, रिटेल दुकाने आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्याची किंमत ₹63,990 पासून सुरू होते.