Opera Web Browser: opera ने लाँच केलं नवीन वेब ब्राउजर! मानसिक आरोग्यासह मिळणार 'हे' फीचर्स
टेक कंपनी Opera ने त्यांचा वेब ब्राऊझर लाँच केला आहे. Opera ने ‘Opera Air’ नावाचा एक नवीन वेब ब्राउझर लाँच केला आहे. Opera Air मध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत, जे मानसिक आरोग्य आणि माइंडफुलनेसवर लक्ष केंद्रित करतात. या ब्राउझरमध्ये ब्रेक रिमाइंडर्स, श्वासोच्छवासाचे व्यायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि बाइनॉरल बीट्ससारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी वापरकर्त्यांना लक्ष केंद्रित करण्यास आणि ताण कमी करण्यास मदत करतात.
इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर
Opera चं हे ब्राउझर विशेषतः ऑनलाइन काम करताना मानसिक संतुलन राखण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जेणेकरून लोक त्यांच्या कामावर चांगले लक्ष केंद्रित करू शकतील. यापूर्वी देखील Opera ने त्यांच वेब ब्राऊझर लाँच केलं होतं, आता पुन्हा एकदा एक नवीन वेब ब्राऊझर लाँच करण्यात आलं आहे. चला तर मग आता Opera ने लाँच केलेल्या ‘Opera Air’ वेब ब्राऊझरच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य –Opera)
Opera Air मध्ये एक साइडबार देण्यात आला आहे, ज्यामध्ये ब्रेक रिमाइंडर्स आणि बूस्ट फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ब्रेक रिमाइंडर वापरकर्त्यांना दीर्घ कामकाजाच्या दिवसानंतर विश्रांती घेण्याची आठवण करून देतो. यामध्ये श्वास घेण्याचे व्यायाम, मान ताणणे आणि ध्यानधारणा अशा क्रियांचा समावेश आहे. हे व्यायाम लोकं त्यांच्या गरजेनुसार करू शकतात. तुम्ही सतत एकाच ठिकाणी बसून वेब ब्राऊझरचा वापर केला तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. Opera Air मधील बूस्ट फीचर्स तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास आणि मानसिक शांतता प्रदान करण्यास मदत करण्यासाठी संगीत आणि ध्वनीचा वापर करते. या संगीत आणि ध्वनीमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
ऑपेराने माइंडफुलनेस आणि मानसिक शांती वाढविण्यासाठी एक वेगळा ब्राउझर म्हणून ओपेरा एअर लाँच केला आहे. या ब्राउझरमध्ये एक साधी डिजाइन आणि मानसिक आरोग्य साधने आहेत जी लोकांना मानसिक शांती आणि संतुलन राखण्यास मदत करतात. ऑपेराचे ध्येय असे होते की असा ब्राउझर तयार करणे जो केवळ चांगले काम करेलच असे नाही तर वापरकर्त्यांची मानसिक स्थिती देखील सुधारेल.
यापूर्वी कंपनीने ओपेरा वन वेब ब्राउझर लाँच केला होता. हे पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेल्या ब्राउझरचे सुरुवातीचे वर्जन आहे. जनरेटिव्ह एआय कंटेंट, एक्सटेंशन जोडण्यासाठी ओपन स्पेस आणि स्वच्छ दिसणाऱ्या डिझाइनसह हा नवीन ब्राउझर लाँच करण्यात आला होता. यामध्ये टॅब आयलंड नावाचं फीचर देखील आहे.