Upcoming Smartphone: फेब्रुवारीमध्ये लाँच होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स! iQOO पासून Tecno पर्यंत वाचा संपूर्ण यादी
2025 वर्षांत स्मार्टफोन कंपन्या त्यांचे अनेक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जानेवारीमध्ये देखील अनेक नवीन स्मार्टफोन्सनी भारतात एंट्री केली. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये देखील टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये बजेट रेंजपासून ते फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. चला तर मग या अपकमिंग स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest & X)
iQOO Neo 10R हा अपकमिंग स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फोनवर काम करत आहे. आता लवकरच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. iQOO Neo 10R स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर, 144Hz AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. यात पॉवरसाठी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी दिली जाईल, असं सांगितलं जात आहे.
Vivo V50 आणि V50 Pro फेब्रुवारीच्या उत्तरार्धात लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिरीजमधील Vivo V50 बाबत X हँडलवर टीझ करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन विशेष: फोटोग्राफीप्रेमींसाठी लाँच करण्यात येत आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. या सिरीजमध्ये चांगली कॅमेरा प्रणाली देण्यासाठी कंपनीने Zeiss सोबत सहकार्य केले आहे. या मालिकेत 90W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000mAh बॅटरी समाविष्ट आहे.
Xiaomi फेब्रुवारीमध्ये त्याच्या फ्लॅगशिप Xiaomi 15 सिरीज लाँच करण्याची योजना आखत आहे. अल्ट्रा मॉडेल MWC 2025 मध्ये प्रीमियर होणार आहे. Xiaomi 15 आणि 15 Pro मध्ये Leica कॅमेरा, Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 90W चार्जिंगसह 5,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
सॅमसंग दोन नवीन फोन बजेट रेंजमध्ये लाँच करणार आहे. कंपनी ए-सीरीजमध्ये Galaxy A36 आणि Galaxy A56 भारतात लाँच करू शकते. या दोन्ही फोनमध्ये मोठी बॅटरी आणि मिडरेंज प्रोसेसर बसवण्यात येणार आहे.
Infinix आपली Note 50 सिरीज 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत रेंजमध्ये लाँच करू शकते. याबाबत अधिक तपशील येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहेत.
Techno या महिन्यात भारतात आपला पहिला कर्व स्क्रीन स्मार्टफोन लाँच करू शकते, ज्याची किंमत 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल. परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम एस्थेटिक्स ऑफर करण्याची अपेक्षा आहे.
Netflix ने रिलीज केलं नवीन फीचर, या युजर्सना मिळणार फायदा! अशा प्रकारे एकत्र डाऊनलोड करा पूर्ण सीझन
ASUS ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro या महिन्यात भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 5,800mAh बॅटरी आणि 165Hz AMOLED डिस्प्लेसह गेमिंग प्रेमींना लक्षात घेऊन दोन्ही फोन आणले जात आहेत.