Valentine's Day 2025: तुमच्या 'स्पेशल वन'ला गिफ्ट करा Apple चे हे प्रोडक्ट्स, तुमचा दिवस होईल अविस्मरणीय
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. आणि 14 फेब्रुवारी रोजी प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. खरं तर फेब्रुवारीचा महिना प्रेमाचा महिना मानला जातो. या दिवसांत प्रियकर आणि प्रेयसी किंवा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड एकमेकांना गिफ्ट देतात. तुम्ही देखील तुमच्या स्पेशल वनला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल आणि काय गिफ्ट द्यावे हे तुम्हाला समजत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिंना Apple चे काही खास प्रोडक्ट्स गिफ्ट देऊ शकता, ज्यामुळे तुमचा दिवस अजून स्पेशल होऊ शकतो. Apple चे प्रोडक्ट्स म्हणजे केवळ तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग नसेल तर एक अर्थपूर्ण भेट देखील ठरणार आहे. जी तुमच्य पार्टनरसाठी फायद्याची ठरू शकते. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणते अॅपल प्रोडक्ट्स भेट देऊ शकता, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच लाँच करण्यात आलेला iPhone 16 तुम्ही तुमच्या स्पेशल वनला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे खास बनवू शकता. यात 6.1-इंचाचा OLED पॅनेल आहे, जो ट्रू टोन आणि HDR डिस्प्लेला सपोर्ट करतो. अॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करण्यासाठी हे A18 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. iPhone 16 हा 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.
आरोग्य आणि निरोगीपणाचा साथीदार म्हणून, तुम्ही व्हॅलेंटाईन डे तुमच्या प्रिय व्यक्तिला Apple Watch SE देखील भेट देऊ शकता. स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे अनेक फीचर्स त्यात उपलब्ध आहेत. मनगटाचे सौंदर्य वाढवण्यासोबतच ते तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या आरोग्यावरही लक्ष ठेवेल. त्याची किंमत 24,900 रुपयांपासून सुरू होते.
जर तुमच्या व्हॅलेंटाईनला गाणी ऐकण्याची आवड असेल तर AirPods 4 पेक्षा चांगलं गिफ्ट असूच शकत नाही. व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला AirPods 4 भेट देऊन हा दिवस त्याच्यासाठी अधिक खास बनवू शकता. कंपनीच्या या प्रोडक्टमध्ये पर्सनलाइज्ड स्पेटियल ऑडियो आणि डायनॅमिक हेड ट्रॅकिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला 17,900 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
HomePod Mini मध्ये सिंगल फुल-रेंज ड्रायव्हर, ड्युअल पॅसिव्ह रेडिएटर्स आणि 4 मायक्रोफोन आहेत. हे कंप्यूटेशनल ऑडिओला समर्थन देते आणि 360 डिग्री साउंड वितरीत करते. सिरी व्हॉइस कमांड वापरून ते नियंत्रित केले जाऊ शकते. स्मार्ट होम फीचर्स नियंत्रित करण्यापासून ते हँड्स-फ्री कॉल्सपर्यंत, ते अनेक फीचर्स देते. याची किंमत 10,900 रुपये आहे.
MacBook Air M3 ही अशी भेट आहे जी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला अनेक वर्षे आठवणीत राहिल. अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह आणि शक्तिशाली परफॉर्मेंससह, MacBook Air M3 क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटी एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल. त्याची सुरुवातीची किंमत 1,14,900 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही iPad Air किंवा iPad Mini देखील भेट देऊ शकता. Apple App Store च्या मदतीने तुम्ही Apple उत्पादनांवर तुमचे आवडते नाव आणि नंबर इत्यादी लिहू शकता.