भारत वेगाने पुढे जातोय, India 6G Vision च्या दिशेने प्रवास सुरु! कधी मिळणार फास्ट स्पीड इंटरनेट?
भारतात 5G नंतर आता 6G नेटवर्क लाँच करण्याची तयारी वेगाने सुरु झाली आहे. भारताचा प्रवास 6G च्या दिशेने सुरु असून भारतात लवकरच 6G नेवटर्क देखील सुरु होणार आहे. याबाबत सरकार देखील वेळोवेळी अपडेट देत असते. भारत 6G व्हिजनसह वेगाने पुढे जात आहे. आपले 6G व्हिजन पुढे नेण्यासाठी सरकार मल्टी-पोर्ट स्विच सिंगल ब्रॉडबँड अँटेना विकसित करत आहे. हा अँटेना सर्व 2G, 3G, 4G आणि 5G बँडला एकाच वेळी सपोर्ट करेल.
हेदेखील वाचा- iOS 18.2 Update: बॅटरी हेल्थ ट्रॅक करण्यासाठी iPhone युजर्सना मिळणार नवीन फीचर, कधी होणार रिलीज?
या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच अँटेनामधून सर्व बँड नॉइस फ्री पद्धतीने चालवण्याचा सरकारचा विचार आहे. आतापर्यंत, नेटवर्कच्या वेगवेगळ्या बँडमध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळे अँटेना आवश्यक आहेत. यासाठी सरकार प्रयत्न करत असून लवकरच भारतात 6G नेवटर्क देखील लाँच केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
CSIR-सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CEERI), पिलानी आणि दूरसंचार विभाग (DoT) चे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) संयुक्तपणे हा अँटेना विकसित करत आहेत. या सिंगल बँड अँटेनासाठी ट्यूनेबल इम्पेडेंस मॅचिंग नेटवर्क असलेले मल्टीपोर्ट स्विच विकसित केले जात आहे. DoT चा टेलीकॉम टेक्नोलॉजी डेवलपमेंट फंड (TTDF), जो भारतीय उद्योजकांना, शैक्षणिक संस्थांना आणि संशोधन आणि विकास केंद्रांना दूरसंचार उपाय विकसित करण्यात मदत करतो. हा फंड आता भारतातील 6G नेवटर्क प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या India 6G Vision च्या अनुषंगाने, मायक्रो-इलेक्ट्रोमेकॅनिकल टेक्नोलॉजीवर आधारित या प्रकल्पामध्ये अँटेना चांगल्या कामगिरीसह एकाच वेळी अनेक बँड कव्हर करण्याची क्षमता ठेवेल. यासोबतच, टेलीकॉम डिपार्टमेंट 6G संशोधनासाठी दोन नेक्स्ट जनरेशन टेस्टबेडसाठी निधीही देत आहे. यासोबतच, विभाग एक्सेलरेटेड रिसर्च ऑन 6G इकोसिस्टम प्रोग्राम अंतर्गत 470 प्रस्तावांवर विचार करत आहे.
हेदेखील वाचा- OnePlus 12 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज
2030 पर्यंत भारत 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी शक्ती बनेल, या दिशेने सरकार प्रयत्न करत आहे. भारत 6G पेटंट फाइलिंगमध्ये जगात आघाडीवर आहे. भारताने नुकतेच नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ – जागतिक दूरसंचार मानक असेंब्ली (ITU-WTSA 2024) चे यशस्वी आयोजन केले. भारतात आयोजित या कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या प्रस्तावांना जगभरातील सदस्य देशांकडून मोठा पाठिंबा मिळाला.
2030 पर्यंत भारतात 6G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. C-DOT च्या 6G इनोव्हेशन लॅबमध्ये Reconfigurable Intelligent Surface (RIS) सारख्या अनेक तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे. RIS च्या मदतीने, 6G सेवा अगदी डोंगराळ भागातही सहज पुरवली जाऊ शकते. भारतात 5G सेवा ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाली, तर जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा 2019-20 मध्येच सुरू झाली.






