Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी गेमिंग कंपनी गरेना रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. आज देखील कंपनीने 19 सप्टेंबरसाठीचे रिडीम जारी केले आहेत. आज जारी करण्यात आलेल्या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना डायमंड, आउटफिट आणि इमोट मोफत मिळणार आहेत. पण यासाठी फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना लवकरात लवकर जाऊन हे रिडीम कोड्स क्लेम करावे लागणार आहेत. हे रिडीम कोड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना गरेनाच्या ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइटवर जावं लागणार आहे.
फ्री फायर मॅक्स गेममध्ये रिडीम कोड्ससोबतच गेमिंग वस्तूंची देखील सर्वाधिक मागणी असते. प्लेअर्स या गेमिंग वस्तूंच्या मदतीने गेममध्ये दिर्घकाळ जिवंत राहू शकतात आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. या गेमिंग वस्तूंमध्ये प्लेअर्स वेपन स्किनला सर्वाधिक प्राधान्य देतात. वेपन स्किनच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. मात्र वेपन स्किन अनलॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड खर्च करावे लागतात. मात्र हीच वेपन स्किन कमी डायमंड खर्च करून मिळवायची असेल तर प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये सहभागी व्हावे लागते. ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्स कमी डायमंड खर्च करून ही महागडी गेमिंग स्किन मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max मध्ये Mossy Vinehorn वेपन स्किन एक्सक्लूसिव आहे. ही स्किन AWM साठी रिलीज करण्यात आली आहे. या स्किनला हिरवा रंग देण्यात आला आहे. या स्किनमधून आग बाहेर येते. याची विशेषत: म्हणजेच ही स्किन बंदूकीच्या डॅमेज रेट आणि रेंजला वाढवते. ज्यामुळे दूर असलेल्या शत्रू दुरून देखील निशाणा साधला जाऊ शकतो. ही गेमिंग स्किन प्लेअर्स AWMxAN94 Ring मध्ये स्पिन करून क्लेम करू शकतात.
Booyah Day 2021 गरेनाची अल्ट्रा-एक्सक्लूसिव आणि प्रीमियम स्किन आहे. ही स्किन UMP गनसाठी तयार करण्यात आली आहे. या स्किनच्या मदतीने बंदूकीचा रेट ऑफ फायर आणि डॅमेज रेट वाढवला जाऊ शकतो. या स्किनच्या मदतीने शत्रूंना अगदी सहज नॉक आउट केलं जाऊ शकतं. EVO VAULT ईव्हेंटमध्ये ही गेमिंग स्किन क्लेम केली जाऊ शकते.
ट्रबल मेकर स्किन अलीकडेच फ्री फायरमध्ये जोडण्यात आली आहे. या स्किनमुळे बंदूकीचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या Hello Trouble Ring ईव्हेंटमध्ये ही वेपन स्किन क्लेम केली जाऊ शकते.
फ्री फायर मॅक्स काय आहे?
फ्री फायर मॅक्स हा एक गेमिंग प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र अॅप आहे
फ्री फायर मॅक्स आणि फ्री फायरमध्ये काय फरक आहे?
फ्री फायर मॅक्स हे अधिक स्पेसिफिक-हेवी वर्जन आहे.