आज जिकडे तिकडे UPIचा वापर होत आहे. शहरात, गावात, दुकानात, रिक्षात, हॉटेल्स, रेस्टऑरेंत, चहाची टपरी अश्या अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करत आहेत. अनेक लोकांनी खिश्यात कॅश म्हणजेच रोक रक्कम वापरणे जवळजवळ बंद केले आहे. कधी कधी इंटरनेटची सुविधा कमी असल्याने म्हणजेच कुठे कुठे इंटरनेट कव्हरेज न पकडल्याने पेमेंट करणे कठीण होते. आणि कधी कधी असे देखील होते की आपल्याकडे पुरेसे पैसे देखील नसता. मग अश्या परिस्थिती आपण घाबरतो आणि जवळच्या व्यक्तीला फोन करून पेमेंट करायला सांगतो. परंतु आता असं करायची गरज पडणार नाही. कारण आता तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता.
आता तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता. हो! हे खरं आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. त्याचे फायदे काय आणि कोणत्या बँका देखील सुविधा देत आहेत हे देखील जाणून घेऊया.
कसे कराल इंटरनेटशिवाय UPI पेमेंट?
काय आहे फायदे?
या ट्रिकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इंटरनेट नसलेल्या भागातही सहजपणे पेमेंट करू शकता. तुम्ही अशा प्रकारे सामान्य कीपॅड मोबाईल फोन वापरूनही पेमेंट करू शकता. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ही सुविधा वापरू शकता. ही एक खास सुविधा आहे जी २४*७ उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्याचीही आवश्यकता नाही.
कोणत्या बँका देत आहे सुविधा?
ही सुविधा जवळजवळ सर्व प्रमुख बँकांद्वारे दिली जाते. ज्यात HDFC, SBI, ICICI बँक, अॅक्सिस बँक, PNB आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे.