ट्रम्प यांचा मोठा दणका! अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' यादी जाहीर; गुन्हेगारांच्या यादीत भारतीयांचीही नावे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सार्वजनिक डेटाबेस म्हणून जाहीर केलेल्या या यादीत जवळजवळ २५,००० बेकायदेशीर परदेशी गुन्हेगारांची नावे आहेत. खून, लैंगिक गुन्हे आणि अंमली पदार्थोंच तस्करी वासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी त्यांन दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) तसेच कस्टम्म आणि बॉर्डर प्रोटेक्शनद्वारे अटक करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणू प्रचारादरम्यान बेकायदेशीर स्थलांतरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
अमेरिकन गृह सुरक्षा विभागाने सुरू केलेल्या WOW.DHS.GOV वेबसाइटवर गुन्हेगारांची नावे, फोटो, केलेले गुन्हे आणि राष्ट्रीयत्व सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. अमेरिकन सरकार कोणत्या बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना अटक करत आहोत, त्यांनी कोणते गुन्हे केले आहेत हे अमेरिकन लोकांना पाहता येईल, यासाठी ही वैबसाइट सुरू करण्यात आली असल्याचे, अमेरिकन गृह विभागाने म्हटले आहे. धोकादायक गुन्हेगारांच्या या यादीत भारतीय अमेरिकन अमनदीप मुलतानी आणि हरजिंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचे आरोप आहेत.
तथापि, ही कारवाई अमेरिकेतही वाद निर्माण करत आहे. अनेक राज्यांमध्ये इमिग्रेशन छाप्यांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांसह काही रिपब्लिकन नेतेही या कारवाईवर नाराज आहेत. अमेरिकन काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक कायदेकत्यांनी गृह विभागाला मिळणारा निधी थांबवला आहे. इमिग्रेशन आणि कस्टम्स मध्ये – सुधारणांची मागणी केली आहे. त्यांची मागणी आहे की सरकारी एजंट्सनी बॉडी कॅमेरे घालावेत आणि त्यांचे ओळखपत्र प्रदर्शित करावे. या एजंट्सनी त्यांचे मास्क काढावेत जेणेकरून त्यांची ओळख पटेल अशी त्यांची मागणी आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
Ans: अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) खतरनाक गुन्हेगारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचा समावेश असून त्यांच्यावर हत्या, लैंगिक शोषण, अंमली पदर्थांची तस्करीचे आरोप आहेत.
Ans: अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) जाहीर केलेल्या गुन्हागारांच्या यादीत ८९ भारतीयांचा समावेश आहे?
Ans: अमेरिकन गृह सुरक्षा विभागाने सुरू केलेल्या WOW.DHS.GOV वेबसाइटवर गुन्हेगारांची यादी जाहीर केली आहे.






