अखेर समजलंच! क्रिकेटर विराट कोहली वापरतो हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या स्टाईल आणि खेळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. विराट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील विराट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता ही चर्चा आहे विराट कोहलीच्या फोनची. विराट कोहलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये असे देखील अनेक व्हिडीओ असतात, ज्यामध्ये विराट त्याची पत्नी अनुष्कासोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसतो. पण विराट ज्या फोनवरून त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल करतो तो स्मार्टफोन कोणत्या ब्रँडचा आहे तुम्हाला आहे का?
अनेकदा चाहत्यांच्या मनात देखील हा प्रश्न अनेकदा येतो की विराट कोहली कोणता फोन वापरतो? तो फक्त जाहिरातींसाठी ब्रँडचे फोन वापरतो का की त्याच्याकडे खरोखर एखादे आवडते डिव्हाइस आहे? आता आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत. विराट कोहली कोणता स्मार्टफोन वापरतो हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest, Instagram)
खरंतर, 2023 च्या विश्वचषकादरम्यान, विराट कोहली आयफोन वापरताना दिसला होता. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, तो आयफोन 15 प्रो (1 टीबी व्हेरिएंट) वापरतो, ज्याची किंमत भारतात सुमारे 1,90,000 रुपये आहे. हे मॉडेल अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आणि महागडा स्मार्टफोन आहे. विराटला अनेक वेळा आयफोनसोबत पाहिले गेले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की आयफोन हा त्याचा प्राथमिक डिव्हाइस आहे. विशेषतः कॅमेरा गुणवत्ता, कामगिरी आणि गोपनीयता यासारख्या वैशिष्ट्यांमुळे, अॅपलचा स्मार्टफोन सेलिब्रिटींची पहिली पसंती राहिला आहे.
विराट फक्त आयफोनच वापरतो असं नाही. तर विराट विवोचा सेकेंडरी फोन म्हणून वापर करतो. त्याला अनेक वेळा विवो स्मार्टफोनसोबतही पाहिले गेले आहे. मार्च 2023 मध्ये, तो विमानतळावर विवोच्या फोल्डेबल स्मार्टफोन एक्स फोल्ड प्लससह दिसला. हा फोन विशेषतः त्याच्या माउंटन ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये दिसला. याआधीही विराट कोहली Vivo V25 सोबत दिसला आहे. विवो डिव्हाइसेस देखील विराटच्या डिजिटल आयुष्याचा एक भाग आहेत यात काही शंका नाही.
विराट कोहलीने चिनी स्मार्टफोन ब्रँड विवोसोबत एंडोर्समेंट करार केला आहे. म्हणूनच तो सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या विवो फोनसह दिसतो. ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने, विराटला कंपनीच्या नवीन लाँच केलेल्या उपकरणांची चाचणी घेण्याची आणि त्यांची जाहिरात करण्याची संधी मिळते. तथापि, हे स्पष्ट आहे की व्यावसायिक करार असो किंवा वैयक्तिक निवड, विराट Apple आणि Vivo या दोन्ही ब्रँडमध्ये संतुलन राखतो.