Dinvishesh : लोककल्याणकारी राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती; जाणून घ्या ३१ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज मे महिन्याचा शेवटटा दिवस. आजच्या दिवस इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आजच्या दिवशी १७२५ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला होता. न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या राजकर्त्या म्हणून त्यांना ओळखले जाते. काशी, द्वारका, नाशिक, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरे घाट आणि धर्मशाळा उभारल्या. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर आणि इंदूरच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. समाजकल्ल्याण आणि सरकारमध्ये सुधारणा यांसाठी त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.
31 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
31 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






