Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज
टेक कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo Y400 Pro 5G लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. विवोने त्यांच्या इंडिया वेबसाइटवर एका इवेंट पेजद्वारे Y-सीरीजच्या नवीन स्मार्टफोनची झलक शेअर केली आहे. असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या आगामी स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
Vivo Y400 Pro 5G मध्ये 4,500 निट्स पीक ब्राइटनेससह 6.77-इंच AMOLED स्क्रीन दिली जाणार आहे. हे आगामी डिव्हाईस MediaTek Dimensity 7300 चिपसेटवर आधारित असणार आहे. यामध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. Vivo ने एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओद्वारे कंपनीने आगामी डिव्हाईसच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या इंडिया वेबसाइटवर एक लँडिंग पेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये अपकमिंग डिवाइसचे रिअर डिझाईन टिझ करण्यात आली आहे. Vivo ने फोनच्या लाँच डेटचा अद्याप खुलासा केला नाही. मात्र कंपनीने स्मार्टफोनच्या लँडिंग पेजवर कमिंग सून असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टिझर व्हिडीओमध्ये Vivo Y400 Pro 5G व्हाइट शेडमध्ये दाखव्यात आला आहे. ज्यामध्ये रियरवर पिल-शेप्ड डुअल कॅमेरा यूनिट आहे. कॅमेरा सेंसर वर्टिकली प्लेस्ड आहे आणि यासोबतच एक रिंग LED फ्लॅश देखील आहे.
लीक्सवर विश्वास ठेवला तर, Vivo Y400 Pro 5G ची किंमत भारतात 25,000 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन गोल्ड, नेबुला पर्पल, आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Vivo Y400 Pro मध्ये 6.77-इंच फुल-HD+ 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन MediaTek Dimensity 7300 चिपसेट वर आधारित असणार आहे. फोनची जाडी 7.4mm असणार आहे आणि हा फोन Android 15-बेस्ड Funtouch 15 सह लाँच केला जाऊ शकतो. अशी चर्चा आहे की Vivo Y400 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी रिअर सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल शूटर असेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यात 90W चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.