iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हालाही मिळणार Android वालं हे WhatsApp फीचर, फॉलो करा या स्टेप्स
मेटा त्याच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपसाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कधी अँड्रॉईड युजर्ससाठी तर कधी आयफोन युजर्ससाठी, कंपनी नवीन अपडेट्स आणि फीचर्स सतत लाँच करत आहे. आता कंपनी आयफोन युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे, हे खास फीचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट फीचर. खरं तर हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आधीच लाँच करण्यात आलं आहे. आता हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील उपलब्ध केलं जाणार आहे.
नवीन फीचरच्या मदतीने आता आयफोन युजर्स देखील अँड्रॉईडड युजर्सप्रमाणे मल्टीपल अकाऊंट वापरू शकणार आहे आणि यासाठी दुसरे अॅप डाऊनलोड करण्याची देखील गरज नाही. या वर्षाच्या सुरुवातीला मेटाने इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी iOS डिव्हाईसमध्ये मल्टी-अकाउंट सपोर्ट देण्यासाठी काम सुरु केलं होतं. आता अशी माहिती समोर आली आहे की, लवकरच WhatsApp सेटिंग्समध्ये हे फीचर उपलब्ध असणार आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला WhatsApp वर साईन इन करण्यात आलेले सर्व अकाऊंट्स पाहायला मिळणार आहेत, जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही अकाऊंटवर स्विच करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
📝 WhatsApp beta for iOS 25.19.10.74: what’s new?
WhatsApp is working on a feature that allows users to switch between multiple accounts, and it will be available in a future update!https://t.co/SO2PYfQXmW pic.twitter.com/cksgAQQq8N
— WABetaInfo (@WABetaInfo) June 29, 2025
म्हणजेच आता आयफोन युजर्सना देखील एकाच अॅपमध्ये मल्टीपल अकाऊंटचा वापर करता येणार आहे. सध्या हे फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे, मात्र आता लवकरच हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार मेटा लवकरच इंस्टंट मेसेजिंग अॅपसाठी मल्टी-अकाउंट फीचर सादर करणार आहे. या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे. हे iOS बीटा अॅप वर्जन 25.19.10.74 साठी WhatsApp वर स्पॉट करण्यात आले आहे. हा फीचर यूजर्सना iPhone वर वेगवेगळ्या अकाउंट, पर्सनल आणि प्रोफेशनल चॅटींगदरम्यान स्विच करण्याची सुविधा देतात.
रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये WhatsApp सेटिंग्समध्ये एक नवीन अकाउंट लिस्ट पाहायला मिळत आहे. असं सांगितलं जात आहे की, हे डिव्हाईस अनेक अकाऊंट मेनेज करण्यासाठी एक Centralized Hub प्रमाणे कम करणार आहे. येथून यूजर्स अकाउंट जोडू किंवा काढू शकतील. जेव्हा यूजर्स विशिष्ट अकाउंट निवडतात, तेव्हा WhatsApp त्याच्याशी संबंधित चॅट हिस्ट्री लोड करेल आणि सेटिंग्ज आणि प्राधान्ये बदलेल. इतकेच नाही तर, अकाउंट्समध्ये स्विच करण्यासाठी WhatsApp मधून लॉग आउट करण्याची किंवा अॅप रीस्टार्ट करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला केवळ अकाऊंट स्विच करावं लागणार आहे.