WWDC 2025: अॅपल ईव्हेंटमध्ये watchOS 26 लाँच, नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह मिळणार हे धमाकेदार फीचर्स
वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) 2025 मध्ये Apple ने त्यांच्या वॉच युजर्ससाठी देखील अनेक अपडेट्स लाँच केले आहेत. या ईव्हेंटवेळी कंपनीने watchOS 26 अधितकृतपणे लाँच केलं आहे. यावेळी लाँच करण्यात आलेल्या अपडेटमुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. watchOS 26 दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीने Liquid Glass डिझाईन आणि एक नवीन Workout Buddy फीचर दिलं आहे, जे Apple Intelligence ने सुसज्ज आहे. अॅपल वॉच अधिक पर्सनल, यूजफुल आणि मोटिवेशनल व्हावी यासाठी watchOS 26 लाँच करण्यात आलं आहे.
watchOS 26 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन Liquid Glass डिझाइन लँग्वेज. आता Apple Watch चा इंटरफेस पूर्वीपेक्षा अधिक ट्रांसपरेंट, स्मूद आणि फ्यूचरिस्टिक होणार आहे. स्मार्ट स्टॅक, कंट्रोल सेंटर, फोटो वॉच फेस आणि अॅप्सचे नेविगेशन आता रियल-टाइम रेंडरिंग इफेक्ट्ससह येणार आहेत. एवढंच नाही तर वॉच फेसवर दिसणाऱ्या संख्यांना देखील नवीन लूक देण्यात आला आहे, ज्यामुळे डिस्प्ले स्पेसचा अधिक चांगला वापर होऊ शकतो.
watchOS 26 मध्ये एक नवीन स्मार्ट फिटनेस फीचर देखील आला आहे, ज्याचं नाव आहे वर्कआऊट बडी. हे फीचर तुमचे हार्ट रेट, स्पीड, आणि वर्कआउट हिस्ट्रीच्या आधारे लाईव्ह मोटिवेशन देतो. हे Apple Intelligence चा वापर करते आणि Fitness+ ट्रेनर्सच्या आवाजात डायनामिक स्पीच जेनरेट करते. जर तुम्ही धावत असाल तर हे फीचर बोलू शकते की, फक्त 18 मिनिटे बाकी आहेत आणि तुमचा व्यायामाचा टप्पा पूर्ण होणार आहे. किंवा – “गेल्या 28 दिवसांतील हा तुमचा सर्वात मोठा टप्पा होता.” हे यूजर्सना प्रॅक्टिकल आणि टाइम-सेन्सिटिव मोटिवेशन देते. (फोटो सौजन्य – X)
WWDC 2025 : Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26! लूक आणि नावासह झाले हे बदल
watchOS 26 चा डेव्हलपर बीटा आता उपलब्ध आहे. पब्लिक बीटा या उन्हाळ्यात येईल आणि अंतिम रिलीज सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल. हे अपडेट Apple Watch Series 6 आणि नंतरच्या मॉडेल्ससाठी उपलब्ध असेल. लक्षात ठेवा की अनेक AI वैशिष्ट्यांसाठी तुम्हाला Apple Silicon असलेल्या iPhone सोबत जोडलेले घड्याळ आवश्यक असेल.