Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स
टेक कंपनी Xiaomi चा नवीन फोल्डेबल फोन Xiaomi Mix Flip 2 गुरुवारी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोन आहे. फोनमध्ये अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोल्डेबल फोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय नवा फोल्डेबल फोन वेगवेगळ्या स्टोरेज आणि रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर
Xiaomi लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 71,500 रुपये आहे. तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 77,000 रुपये आणि 16GB रॅम + 1TB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 7,299 म्हणजेच सुमारे 81,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये नेबुला पर्पल, लॅटिस गोल्ड, प्लम ग्रीन, आणि शॅल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट वाला Xiaomi Mix Flip 2 फोन Android 15 वर आधारित असून कंपनीच्या HyperOS 2 स्किनवर चालतो. यामध्ये 4.01-इंच AMOLED कवर डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz तक रिफ्रेश रेट, 120Hz टच सँपलिंग रेट आणि 1.5K रेजोल्यूशन आहे. हा एक्सटर्नल डिस्प्ले Xiaomi च्या Dragon Crystal Glass 2.0 प्रोटेक्शनसह येतो. आतील बाजूस फोनमध्ये 6.86-इंच AMOLED मेन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन, 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 300Hz टच सँपलिंग रेट आणि120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. फोल्डेबल स्मार्टफोन Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि मॅक्जिमम 1TB स्टोरेज आहे. यामध्ये मेटल फ्रेम देण्यात आली आहे.
Xiaomi Mix Flip 2 मध्ये Leica-ब्रँडेड डुअल आउटवर्ड-फेसिंग कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल Light Hunter 800 इमेज सेंसर आहे. हे Leica Summilux ने सुसज्ज आहे, जो 24mm फोकल लेंथ ऑफर करतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्यामध्ये 14mm फोकल लेंथ आणि ऑटोफोकस आहे. इनर डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
Xiaomi Mix Flip 2 च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NavIC, NFC, GPS, Galileo, GLONASS, Beidou, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, बॅरोमीटर, डिस्टेंस सेंसर, ई-कंपास, फ्लिकर सेंसर, हॉल सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, लीनियर मोटर, IR कंट्रोल, आणि X-एक्सिस लीनियर मोटर यांचा समावेश आहे. हँडसेटमध्ये Dolby Atmos सपोर्टसह स्टीरियो डुअल स्पीकर्स देण्यात आलं आहे.
Xiaomi Mix Flip 2 मध्ये 5165mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. Xiaomi Mix Flip च्या 4780mAh बॅटरीपेक्षा ही लक्षणीय सुधारणा आहे. हँडसेटमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी ड्युअल व्हेपर चेंबर थ्री-डायमेन्शनल कूलिंग सिस्टम आहे. क्लॅमशेल फोल्डेबलचे वजन 199 ग्रॅम आहे.