Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन...
अलीकडेच स्मार्टफोन कंपनीने OnePlus 15 हा नवीन डिव्हाईस लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या लाँचिंगनंतर आता OnePlus 13 ची किंमत कमी झाली आहे. जर तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. कारण तुम्हाला बजेट किंमतीत आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
फ्लिपकार्ट OnePlus 13 च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहे. बँक ऑफर्ससह ही डिल आणखी आकर्षक बनते. खरं तर हा स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या बाबतीत अतिशय चांगला अनुभव देतो. OnePlus 13 त्याच्या प्रीमियम बिल्ड क्वालिटी, हाय-एंड प्रोसेसर, दमदार कॅमेरा सेटअप आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफसाठी ओळखला जातो. अलिकडच्या फ्लिपकार्ट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह, हे डिव्हाइस 2025 मधील सर्वात किमतीचा वनप्लस स्मार्टफोन बनला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्टवर OnePlus 13 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 62,489 रुपये झाली आहे. खरं तर हा स्मार्टफोन 69,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 11,510 रुपयांचे थेट डिस्काऊंट ऑफर करत आहे. एवढंच नाही तर तुम्ही Flipkart SBI क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला या डिव्हाईसच्या खरेदीवर 4 हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. या सर्व ऑफर्स एकत्रित केल्यानंतर, फोनची प्रभावी किंमत 58,489 रुपयांपर्यंत कमी होते. हा फोन मिडनाईट ओशन आणि ब्लॅक एक्लिप्स या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
OnePlus 13 मध्ये 6.82-इंचाचा LTPO 4.1 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. म्हणजेच युजर्स उन्हात देखील स्पष्टपणे स्मार्टफोनची स्क्रीन पाहू शकतात.
कंपनीच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला आहे, ज्याला Adreno 830 GPU सह जोडण्यात आलं आहे. हे कॉम्बिनेशन मल्टीटास्किंग, हाय-एंड गेमिंग आणि हेवी अॅप्सना अतिशय स्मूदपणे चालवण्यासाठी उत्तम आहे. OnePlus ने या फोनमध्ये Android 15 बेस्ड UI दिला आहे आणि 4 मेजर Android अपडेट देणार असल्याचे वचन देखील दिले आहे.
OnePlus 13 कॅमेरा डिपार्टमेंट देखील अतिशय मजबूत आहे. यामध्ये तिन्ही 50MP कॅमेरे समाविष्ट आहेत. फोनमध्ये 50MP OIS प्राइमरी सेंसर, 50MP 120° अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (3X ऑप्टिकल जूम) आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो तीक्ष्ण आणि तपशीलवार आउटपुट प्रदान करतो.
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
या डिव्हाईसमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ज्यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होतो.
Ans: भारतभर OnePlus चे अधिकृत सर्व्हिस सेंटर उपलब्ध आहेत. MyOnePlus App किंवा अधिकृत वेबसाइटवर तपासता येतात.
Ans: Amazon, Flipkart, OnePlus Store App आणि OnePlus Experience Stores मध्ये उपलब्ध आहेत.
Ans: होय. Snapdragon फ्लॅगशिप चिपसेट, AMOLED डिस्प्ले आणि गेमिंग मोडमुळे गेमिंग परफॉर्मन्स खूप स्मूथ असतो.






