कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2026
कल्याण डोंबिवली महापालिकेत सध्या १२२ प्रभाग आहेत. याठिकाणी ५२ जागांवर शिवसेना, ४२ जागा भाजपा, मनसे ९ आणि इतर पक्षीय संख्याबळ आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १२२ पैकी २० उमेदवार बिनविरोध निवडून आले. १०२ जागांकरीता मतदान पार पडल्यावर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून निकाल लागेल.
बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आपले पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या नागरिकांना, "तुमचे मतदान आधीच झाले आहे," असे सांगण्यात आले.
KDMC Political News: डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष मनोज घरत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.