crime ( फोटो सौजन्य - pinterest)
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. दोघे लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. याच कारणाने आरोपीने तरुणीची गळा आवळून हत्या केली.
Cyber Crime: भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; पोलिसांकडून गुन्हा दाखल
२२ एप्रिल रोजी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. २९ एप्रिल रोजी या तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दाखल घेत कल्याण क्राईम ब्रांचने तिच्या प्रियकराला अटक केली. आरोपीचा नाव सुभाष भोईर आहे. आरोपीला कल्याण दुर्गाडी पुल येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुभाष भोईर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.
नेमकं काय प्रकरण ?
सुभाष भोईरचे कोरोना काळात रुग्णालयात काम करणाऱ्या नर्ससोबत प्रेम प्रकरण झाले. या तरुणीसोबत तो गेल्या तीन वर्षा पासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होता. गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये अनेक दिवसानापासून वाद सुरु होते. याच वादातून सुभाष भोईर याने या तरुणीचा गाला आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तो थेतून पळून गेला . अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण क्राईम ब्रांचने २० तासात सुभाष भोईर याला अटक केली आहे.
सुभाष भोईर हा ठाकुर्ली येथे राहत होता. त्याचे मृत तरुणीसोबत प्रेम संबंध होते. यातूनच दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. काही म्हणियापासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. २२ तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला त्यामुळे सुभाष भोईर संतापला आणि त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्याने तरुणीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर त्याने तेथून पळ काढला.
तरुणीचा मृतदेह बंद घरात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र आठवडाभराने तरुणीच्या कुटुंबियांनी या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा तपास सुरू केला .
कल्याण क्राईम ब्रांचला सुभाष भोईर याच्यावर संशय होता. हत्या केल्यानंतर सुभाष भोईर पसार झाला होता. अखेर तांत्रिक तापास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाषभोईर हा हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला अटक केली. सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.
लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून मुलानेच बापाला संपवलं; आईला मारहाण केल्याचा राग अनावर