उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं (Photo Credit- X)
‘योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरच!’
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योजना सुरू करताना शासनाने सकारात्मक भावनेने निर्णय घेतला होता. आचारसंहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून आगाऊ निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. “लाभार्थी बहिणींनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनादेश दिला आहे. त्यामुळे ही योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरच, आम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत, त्या योग्य वेळी पूर्ण केल्या जातील.” ‘लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी मोठा आधार असून, तिचा विस्तार आणि लाभ सातत्याने सुरू राहील.
ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती: मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या अचूक प्रमाणीकरणासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील प्रगतीची माहिती दिली. योजनेसाठी एकूण २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज पात्रतेनुसार ग्राह्य धरण्यात आले. लाभार्थ्यांचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, आतापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.
अपात्र लाभार्थींवर कारवाई
लाभार्थ्यांच्या सखोल पडताळणीतून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे:






