MMRDA Davos Investment Deal: दावोसमध्ये MMRDA मार्फत ऐतिहासिक करार; NMIA मध्ये उभारणार इनोव्हेशन सिटी (फोटो-सोशल मीडिया)
MMRDA Davos Investment Deal: दावोसमध्ये एमएमआरडीएने ऐतिहासिक करार केले असून, तब्बल २२६.६५ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी अब्जो डॉलर्सच्या दोन ऐतिहासिक गुंतवणूक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारांमुळे एमएमआरडीएच्या विकास धोरणात निर्णायक वळण नोंदवले गेले आहे.
सामंजस्य करारांमध्ये एआयवर आधारित तंत्रज्ञान भागीदारीचा टाटा समूहासोबत केलेला ११ अब्ज डॉलर्सचा करार समाविष्ट असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन सिटी उभारण्याचा त्यामध्ये समावेश आहे. यासोबतच भारत-स्वित्झर्लंड सहकार्याअंतर्गत १५ अब्ज डॉलर्सचा शाश्वत औद्योगिक विकास उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दोन्ही भागीदाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला प्रगत उत्पादन, कृत्रिम FDI बुद्धिमत्ता आणि शाश्वत औद्योगिक वाढीसाठी जागतिक स्तरावर सक्षम केंद्र म्हणून पुढे येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मी महाराष्ट्राच्या औद्योगिक गुंतवणुकीच्या करारांत व्यस्त आहे. मुंबईत आल्यानंतर तिथले करार पाहणार असल्याचे सांगितले. मुंबई तसेच इतर महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत पार पडली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस येथे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आता मुंबईत आल्यानंतरच पुढच्या घडामोडींना वेग येणार आहे. हा करार प्राधिकरणाच्या दूरदृष्टी आणि अंमलबजावणी क्षमतेवर जागतिक स्तरावर व्यक्त झालेल्या अभूतपूर्व विश्वास दर्शवतो. एकूण २४ सामंजस्य करारांद्वारे १३ गुंतवणूक व ११ धोरणात्मक भागीदारी ही गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून, एमएमआरडीएच्या ५१ वर्षांच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक उभारणी आहे.
डब्ल्यूईएफ २०२६ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या २२६.६५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणूक प्रतिबद्धता या पूर्णतः यावर्षी करण्यात सामंजस्य करारांशी संबंधित असून, मागील वीं डब्ल्यूईएफमध्ये एमएमआरडीएद्वारे उभारण्यात आलेल्या ४० अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ दर्शवते. या यशासह, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका सत्रात कोणत्याही अर्धशासकीय संस्थेद्वारे आतापर्यंत साध्य करण्यात आलेली ही सर्वाधिक गुंतवणूक प्रतिबद्धता आहे.






