फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नितीश कुमार रेड्डीच्या वडिलांची प्रतिक्रिया : नितीश कुमार रेड्डी याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या कसोटीत कमालीची कामगिरी करत सेंच्युरी नावावर केली. ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीशपुढे गुडघे टेकताना दिसले. अजूनही ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा शेवटचं विकेट घेतलेला नाही. अजूनही भारताचा संघ मैदानात फलंदाजीसाठी टिकून आहे. नवव्या विकेटसाठी भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह मैदानात आला आणि तो एकही धाव न करता पुन्हा बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शेवटच्या विकेटसाठी मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी आला आणि त्याने उरलेल्या पॅट कमिन्सच्या तीन चेंडूंचा सामना केला आणि यावेळी नितीश कुमार रेड्डी ९९ धावांवर खेळत होता.
IND vs AUS : नितीश-सुंदरच्या जोडीला नॅथन लिऑनने रोखलं पण युवा फलंदाजानं ठोकलं करिअरचं पाहिलं शतक!
नितीश कुमार रेड्डी जेव्हा ९९ धावांवर खेळत असताना भारताच्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वेगाने धावत होते. त्यानंतर पॅट कमिन्सच्या तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर नितीशकडे स्ट्राईक आली आणि त्याने पहिला चेंडू सोडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने बोलँडला चौकार ठोकला आणि त्याच्या करियरचे पहिले शतक नावावर करून सध्या तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे. शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची प्रतिक्रिया झटपट व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. आधी वडिलांनी आपल्या मुलाचे शतक साजरे केले आणि नंतर त्यांचे डोळे ओले झाले.
99 धावांवर नितीश नॉन-स्ट्रायकर एंडवर असताना आणि मोहम्मद सिराज स्ट्राइकवर असताना आणि भारताची फक्त एक विकेट शिल्लक असताना ग्रिलख्रिस्टने त्याला काय वाटतंय असं विचारलं. यावर उत्तर देताना नितीशचे वडील म्हणाले, “सर खूप टेन्शन होते. शेवटची विकेट बाकी होती आणि सिराज स्ट्राइकवर होता, टेन्शन होतं, टेन्शन होतं.”
THE CELEBRATION FROM NKR’S FATHER IS SIMPLY AMAZING. 🥹❤️
– Nitish Kumar Reddy, you’ve made whole India proud. 🇮🇳pic.twitter.com/Gx1PFY7RnE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
टीम इंडियाच्या युवा खेळाडू रेड्डीने १७१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण करून भारताच्या संघाला संकटातून बाहेर काढले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. रेड्डीने ठोकलेल्या शतकामुळे भारताचा संघ मजबूत स्थितीत उभा आहे एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिनाचा खेळ खराब वातावरणामुळे संपवला आहे अजूनही नितीश कुमार रेड्डी संघासाठी नाबाद खेळत आहे. नितीशसोबत वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ (२८५ चेंडू) धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करता आली.