IND vs ENG: विराटच्या सर्वाधिक धावा, जॉर्डन विकेट्समध्ये पुढे, भारत आणि इंग्लंडच्या T20 रेकॉर्डवर एक नजर
नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारी ईडन गार्डन्सवर पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना असेल. मोहम्मद शमी १४ महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करीत आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. २००७ पासून भारत आणि इंग्लंडमध्ये टी-२० सामने खेळले जात आहेत. दोन्ही देशांमधील पहिलाच सामना खूपच ऐतिहासिक होता, जेव्हा युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एका षटकात 6 षटकार मारले. चला तुम्हाला दोन्ही संघांच्या टी-२० रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्डही रोमांचक आहे ज्यामध्ये भारताने २४ पैकी १३ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ११ सामने जिंकले आहेत.
एकमेकांविरुद्ध रेकॉर्ड
एकूण टी२० सामने – २४
भारत जिंकला – १३
इंग्लंड जिंकला – ११
सर्वोच्च धावसंख्या
भारत – २२४/२, अहमदाबाद (२०२४)
इंग्लंड – २१५/७, नॉटिंगहॅम (२०२२)
सर्वात कमी स्कोअर
भारत: १२०/९, ईडन गार्डन्स (२०११)
इंग्लंड: ८०/१०, कोलंबो (२०१२)
सर्वात मोठा विजय (धावांनी)
भारत: ९० धावा, कोलंबो (२०१२)
इंग्लंड: १७ धावा, नॉटिंगहॅम (२०२२)
सर्वात मोठा विजय (विकेटने)
भारत: ८ विकेट्स, मँचेस्टर (२०१८)
इंग्लंड: १० विकेट्स, अॅडलेड (२०२२)
सर्वाधिक धावा
भारत: विराट कोहली – ६४८ धावा
इंग्लंड: जोस बटलर – ४९८ धावा
सर्वात मोठी खेळी
भारत: सूर्यकुमार यादव – ११७ धावा, नॉटिंगहॅम (२०२२)
इंग्लंड: अॅलेक्स हेल्स – ८६* धावा, अॅडलेड (२०२२)
सर्वाधिक विकेट्स
भारत: युजवेंद्र चहल – १६ विकेट्स
इंग्लंड: ख्रिस जॉर्डन – २४ विकेट्स
सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी
भारत: युजवेंद्र चहल – ६/२५
इंग्लंड – जोड डर्नबाख – ४/२२
सर्वाधिक झेल
भारत: विराट कोहली – १० झेल
इंग्लंड: डेव्हिड मलान – ७ झेल
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर. .
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.