माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार
पुणे, शहर प्रतिनिधी : पुण्यात दोन तीन दिवसांपासून ठराविक काळात भरपूर पाऊस झाला आहे. हिंजवडी आय टी पार्क येथेही मोठा पाऊस झाला व रस्त्यावर पाणी साचले, याचे कारण काय आहे हे तपासले असता, हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत हे अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले आहे. जर हे काम यावेळेत पूर्ण झाले नाही तर, पीएमआरडीएला दहा कोटी रुपये दंड बाबत नोटीस देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळा आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या पावसाबाबत माहिती घेतली. पुढच्या आठवड्यात पालखी पुण्यात येत आहे. त्यामुळे पावसामुळे पाणी साचणाऱ्या भागात दुरुस्ती करण्याबाबत सांगण्यात आले आहे. दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे व्हिडीओ सद्या खूप व्हायरल होत आहे. पण सध्या त्याठिकाणी काम सुरू आहे.
Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…
रस्त्याच्या कडेला असलेली पावसाळी गटारे व झालेला मोठा पाऊस यामुळे पाणी रस्त्यावर आले. मात्र आज या गटारांची रुंदी व खोलीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालखी घाटातून जाताना अनेक जण डोंगरावर बसतात पण या डोंगरावरील खडक ठिसूळ असल्याने जागोजागी बॅरिकेट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. घाटातील फ्लेक्स, जाहिरात फलक ककाढण्यास सांगितले आहे असे पवार यांनी सांगितले.
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी दिला होता. याही वर्षी सर्व मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्या दिंड्यांची यादी बनवली आहे. त्यामुळे सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल. असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.