मुंबईकरांनो 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरा, अन्यथा भरावा लागेल २ टक्के दंड (फोटो सौजन्य-X)
Property tax Marathi news : प्रत्येक मालमत्ता करपात्र मालमत्ता आहे. महापालिका क्षेत्रातील कोणतेही घर, जमीन, इमारत, फ्लॅट इत्यादींवर कर आकारला जातो. एखाद्या व्यक्तीला आयकर भरणे ज्याप्रमाणे आवश्यक असते त्याचप्रमाणे स्थावर मालमत्तेवर मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) भरणे आवश्यक आहे. याचदरम्यान आता महानगरपालिकेने (BMC) मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निश्चित केली आहे. या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरला नाही, तर बीएमसीकडून १ जानेवारी २०२५ पासून दंड वसूल करण्यात येईल. बीएमसी थकित रकमेवर 2% दंड आकारेल. यासंदर्भात बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांना मालमत्ता कर जमा करणे सोपे व्हावे यासाठी सर्व प्रभाग कार्यालये (नागरी सुविधा केंद्रे) शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १० आणि ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील मालमत्ता कराच्या दरात वाढ करण्याचा बीएमसीचा प्रस्ताव राज्य सरकारने परत केला होता. एप्रिल, 2024 ते सप्टेंबर, 2024 आणि ऑक्टोबर, 2024 ते मार्च, 2025 या सहा महिन्यांची देयके मालमत्ताधारकांना एकाच वेळी पाठवण्यात आली आहेत. केवळ नियमित करदात्यांकडूनच नव्हे तर वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडूनही कर वसूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
बीएमसीने 2024-25 या आर्थिक वर्षात 6200 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु आतापर्यंत केवळ ३५८२ कोटी रुपये (५८%) बीएमसीच्या तिजोरीत जमा झाले आहेत. या कालावधीत थकबाकीदारांनी कर न भरल्यास कडक दंड आकारला जाईल, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील मालमत्ता कराच्या दरात वाढ करण्याचा बीएमसीचा प्रस्ताव राज्य सरकारने परत केला होता. एप्रिल, 2024 ते सप्टेंबर, 2024 आणि ऑक्टोबर, 2024 ते मार्च, 2025 या सहा महिन्यांची देयके मालमत्ताधारकांना एकाच वेळी पाठवण्यात आली आहेत. केवळ नियमित करदात्यांकडूनच नव्हे तर वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडूनही कर वसूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, जकात बंद झाल्यानंतर, बीएमसीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे, परंतु सर्व नोटिसांवर कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर बीएमसी कठोर होत आहे. सन 2023-24 मध्ये मालमत्ता कर संकलनासाठी 4500 (सुधारित) कोटी रुपये राखून ठेवण्यात आले होते. बीएमसीने ४६८९ कोटी रुपये वसूल केले, जे उद्दिष्टापेक्षा जास्त होते. त्याचप्रमाणे सन 2022-23 मध्ये 4,800 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 5575 कोटी रुपये जमा झाले.