• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • There Is A Possibility Of An Alliance Between Vijay Shivtare And Bjps Sanjay Jagtap

पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?

पुरंदर तालुक्यात आमदार विजय शिवतारे व भाजपचे संजय जगताप एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2026 | 12:30 AM
पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राजकीय घडामोडींना वेग
  • शिवतारे अन् जगताप यांच्यात युती होणार?
  • पुरंदर तालुक्यात नेमकं काय घडतंय?
सासवड/संभाजी महामुनी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेद्वारीसाठी आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राजकीय पक्षांनी एकला चलो ही भूमिका बदलून एकमेकांना हातात हात घालून चालण्याचे संदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्या बैठकीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे आमदार विजय शिवतारे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी बैठक घेतली आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात आमदार विजय शिवतारे व भाजपचे संजय जगताप एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुरंदर तालुक्यासह संपूर्ण राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची नैसर्गिक महाविकास आघाडी आहे. तर शिवसेना भाजपची महायुती आहे. सत्तेच्या सारीपाटात शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. सद्यस्थितीत पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांची शिवसेना भक्कम असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाममात्र आहे. त्याचप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार गटही अंधारात चाचपडत आहेत. मात्र दोन्ही एकत्र आल्यास त्यांची मते नेहमीच निर्णायक ठरणारी आहेत.

राज्यात शिवसेना भाजपची महायुती आहे, मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आणि भाजपचे संजय जगताप यांच्यात विळ्याभोपळ्याचे वैर आहे, हे जगजाहीर आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांना आपापले अस्तित्व टिकवायचे असल्याने राजकीय मतभेद विसरून तात्पुरती युती आघाडी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पुरंदरला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास शिवसेना आणि भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे. कारण राष्ट्रवादी बरोबर नसल्याचा संजय जगताप यांना विधानसभा निवडणुकीत फटका बसलेला आहे.

पुरंदरमध्ये संजय जगताप यांचे सहकाराचे मोठे जाळे आहे. कात्रज दुध संघ, जिल्हा बँक, नीरा बाजार समिती, विविध विकास कामगार सोसायटी, सोमेश्वर साखर कारखाना यावरती राष्ट्रवादीच्या मदतीने अनेक वर्षापासून भक्कम जाळे निर्माण केले आहे. विजय शिवतारे यांना मात्र सहकार क्षेत्र आतापर्यंत दूरच राहिलेले आहे. तसेच आगामी काळातील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा संजय जगताप यांची मदत घ्यावी लागणार आहे. परंतु विजय शिवतारे आणि संजय जगताप यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती होत असेल तर अजित पवारांना मोठा शह बसणार आहे. मात्र संजय जगताप यांना सहकारातील विकास सोसायट्या वगळता इतर निवडणुकीसाठी शिवतारे यांचा फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही.

तालुक्यात भाजपची ताकद असली तरी प्रत्येक नेत्याने आपले वेगळे अस्तित्व ठेवले आहे. गराडे गणमध्ये गंगाराम जगदाळे यांची ताकद आहे, तर दिवे गणात बाबाराजे जाधवराव यांची ताकद आहे. नीरा कोळविहीरे मध्ये माजी आमदार अशोक टेकवडे यांची ताकद आहे. बहुतेक गटगणात भाजपच्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे संबंधित नेते नातेवाईकांच्या प्रचारात अडकून पडल्यानंतर इतर ठिकाणी प्रचार कधी करणार ? परिणामी संजय जगताप यांच्यावर प्रचाराची जबाबदारी येणार असल्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमध्ये असताना जगताप स्वतःच्या विचारांचे उमेदवार देत होते, मात्र आता त्यांना भाजपच्या इतर नेत्यांना विचारात घ्यावे लागणार आहे. परिणामी संजय जगताप यांचे अनेक खंदे समर्थक उमेदवारीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

शिवतारे- जगताप यांची युती झाल्यास दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षांना दोन गट आणि प्रत्येकी चार चार गण दिले तरी शिवतारेंकडे दोन गट आणि चार गण येतील. मात्र भाजपमधील इतर नेते उमेदवारीसाठी आग्रही असून, संजय जगताप यांच्याकडे त्यांच्या विचारांचे उमेदवार देताना चाळण लावावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जावूनही नुकसान करून घेण्यापेक्षा शिवसेनच्या विरोधात लढल्यास स्वतंत्र अस्तित्व राहील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा मार्ग मोकळा राहील.

हे सुद्धा वाचा : पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

विजय शिवतारे यांचासोबत युती झाल्यास शिवतारे यांना नीरा बाजार समिती, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, दुध संघ यामध्ये प्रवेश करण्यास अधिक सोयीस्कर ठरणार आहे. यामध्ये शिवतारे यांचा फायदाच होणार असून, संजय जगताप यांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांना सहकारासह सर्वच ठिकाणी रोखून धरण्यासाठी राष्ट्रवादीशी जवळीक सोयीस्कर ठरणार आहे. मात्र पक्षाच्या आदेशानुसार युती झाल्यास आगामी काळात संजय जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार हे मात्र नक्की.

Web Title: There is a possibility of an alliance between vijay shivtare and bjps sanjay jagtap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Purandar
  • vijay shivtare
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार
1

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…
2

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
3

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार
4

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेला भारताचे जशास तसे उत्तर! टॅरिफला दिले डाळीच्या किंमतीतून उत्तर

अमेरिकेला भारताचे जशास तसे उत्तर! टॅरिफला दिले डाळीच्या किंमतीतून उत्तर

Jan 20, 2026 | 01:15 AM
पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?

पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?

Jan 20, 2026 | 12:30 AM
पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर

पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर

Jan 19, 2026 | 11:23 PM
साताऱ्यात निवडणुकीचा धुरळा! जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु

साताऱ्यात निवडणुकीचा धुरळा! जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु

Jan 19, 2026 | 10:11 PM
Satara Zilla Parishad Election 2026: दोन्ही ‘राजें’मध्ये ४५ मिनिटे खलबते! जागावाटप आणि रणनीतीवर सोनगाव बंगल्यावर चर्चा

Satara Zilla Parishad Election 2026: दोन्ही ‘राजें’मध्ये ४५ मिनिटे खलबते! जागावाटप आणि रणनीतीवर सोनगाव बंगल्यावर चर्चा

Jan 19, 2026 | 09:54 PM
PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?

PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?

Jan 19, 2026 | 09:39 PM
द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक

Jan 19, 2026 | 09:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.