अजित पवारांच्या उमेदवाराला दिलासा (फोटो- सोशल मीडिया)
उमेदवाराच्या तडीपार हायकोर्टाची स्थगिती
आझम काझी होते अजित पवारांचे उमेदवार
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आज दिली स्थगिती
सांगली: अजित पवार गटाचे मिरज येथील उमेदवार आझम काझी यांच्या विरोधातील तडीपार आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली मिरजेतील अजित पवार राष्ट्रवादी पार्टीचे मिरजेतील अधिकृत उमेदवार आझम काझी तसेच त्यांचे निवडणूक प्रतिनिधि रमेश कुंजीरे यांच्या विरोधात केलेल्या हद्दपारीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आज स्थगिती दिली. न्यायाधीश आर जी अवचट व मा. न्यायाधीश अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आझम काझी यांच्या तर्फे ऍडवोकेट कुलदीप उत्तमराव निकम यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील श्रीमती देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली.
या हद्दपारीची आदेशाच्या विरोदात्त महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत ऍडिशनल कमिशनर यांच्याकडे अपील करायची तरतूद आहे. तरीदेखील निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीच्या निकालातील प्रथमदर्शनी अनियमितता दर्शवून दिल्यावर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगली जिल्ह्यात यायचा आझम खान व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी कुंजिरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीची मोठा धक्का अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवारांनी ओवैसींना झापले
एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान होईल” या एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अशा विधानांचे गांभीर्य ते करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. आयएएनएसशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशी विधाने दररोज केली जातात आणि प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही.
ते म्हणाले, “केवळ विधानाशी संबंधित असलेल्यांनीच हे विधान गांभीर्याने घ्यावे. काही लोक फक्त स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी अशी विधाने करतात. माझे स्पष्ट मत असे आहे की या गोष्टींऐवजी विकासावर चर्चा झाली पाहिजे.” मंत्री नितेश राणे यांच्या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे अजित पवार यांनी स्पष्ट उत्तरही दिले. अजित पवार म्हणाले, “जर आमच्या तिन्ही पक्षांमधील कोणत्याही मंत्र्यांनी, खासदारांनी किंवा आमदारांनी विधान केले असेल तर ते पक्षाच्या वतीने आहे की वैयक्तिक विधान आहे हे तपासले पाहिजे. हा प्रश्न त्या व्यक्तीला विचारला पाहिजे. मी यावर कसे भाष्य करू शकतो?”






