सांगलीत भाजपने फुंकलं रणशिंग! जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका; पाहा संपूर्ण वेळापत्रक (photo credit- X)
जिल्ह्यात २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मिरज, जत, कडेगाव, पलूस, आङपाडी तालुक्यात भाजपाने चांगले यश मिळवले होते, एकूण २३ जागा जिंकल्या याच यशाच्या जोरावर इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने मिनी मंत्रालयावर विजयचा झेंडा फडकवला होता, आता सात वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत देखील पुन्हा बाजी मारायच्या तयारीने भाजपने रणशिंग फुंकले आहे.
सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तालुका निहाय भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार दि. १७ आणि रविवार दि. १८ रोजी खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग सांगली येथे होत आहेत, असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली.
महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”
शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६
ता. तासगांव – सकाळी ०९:३० ते ११:००
ता. कवठेमहांकाळ – सकाळी ११:०० ते १२:००
ता. आटपाडी – दुपारी १२:०० ते ०१:००
ता. खानापूर – दुपारी ०१:०० ते ०२:००
ता.शिराळा – दुपारी २.३० ते ३.३०
ता. कडेगाव – दुपारी ३.३० ते ४.३०
ता. पलूस – दुपारी ४.३० ते ५.३०
रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६
ता. मिरज – सकाळी ०९:०० ते ११:००
ता. वाळवा – सकाळी ११:०० ते ०१:००
ता.जत – दुपारी ०१:३० ते ०३:३०
भाजप जिल्हाध्यक्ष, सम्राट महाडिक यांनी सांगितले आहे मुलाखतीस उपस्थित राहताना कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता इच्छुक उमेदवाराने स्वतः एकट्यानेच उपस्थित रहावे, सदर मुलाखत ही भारतीय जनता पार्टीचे आमदार, प्रमुख नेते तसेच कोअर कमिटीच्या टीमकडून घेतली जाईल, इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण बायोडेटा व अर्जासह दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.”






