साताऱ्यामधील आसनी मध्ये वन विभागाने जप्त केलेला खैर झाडांचा साठा चोरीला गेला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara Crime News : मेढा : जावळी तालुक्यातील आसनी येथे मार्च महिन्यात भोगवटा वर्ग एक असलेल्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या खैर झाडांची वृक्षतोड झाली होती. या वृक्षतोडीवर वनपरिक्षेत्र अधिकारी जावली यांनी कारवाई करीत तब्बल आठ ते नऊ टन खैर पंचनामा करीत जप्त केला होता. मात्र हाच जप्त केलेला खैर वनविभागाच्या (Forest Department) कस्टडीतून चक्क चोरीला गेला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केली आहे.
किरण बगाडे यांनी उपवसंरक्षक अमोल सातपुते यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की आसनी येथील शिवारात भोगवटा वर्ग दोन जमीन प्रकारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वृक्षतोडीची परवानगी दिली जात नसताना देखील वनपाल एस डी चौगुले यांच्या वरदहस्ताने भोगवटादार वर्ग दोन जमिनींमध्ये मार्च महिन्यात वृक्षतोड करण्यात आली होती. त्यावेळी ही बाब वनविभागाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करीत येथील खैर जप्त करण्यात आला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वन विभागाकडून जप्त करण्यात आलेला सदर खैर जातीचे लाकूड शेतकऱ्याच्या शेतामध्ये अप्रत्यक्षरित्या शासनाच्या कस्टडीमध्ये होते. तरीदेखील येथील जवळपास आठ ते नऊ टन खैर लाकूड चोरीला गेले आहे. ही बाब गंभीर असून या घटनेची वनविभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून या घटनेस जबाबदार असणाऱ्या वन कर्मचारी चौगुले, वनपाल माने व सदर कालावधीतील प्रभारी असलेले वनपरिक्षेत्रअधिकारी यांच्यावर देखील कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी बगाडे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी इशारा दिला आहे.
शासनाच्या नाकावर टिच्चून’ हम खडा तो सरकार से बडा’ अशी चुणूक शेतकरी व संबंधित खैरवृक्ष तोड करणारा व्यापारी यांनी प्रशासनाला दाखवून दिली असून हा माल शेतकरी आणि व्यापारी यांच्या संगनमताने चोरीला गेला असल्याची चर्चा केळघर परिसरात सुरू आहे.असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दोषींवर कारवाई करावी.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कवठे एकंदला दारू कामात स्फोट
तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात रविवारी दुपारी शोभेचे दारूकाम करताना झालेल्या स्फोटाने गाव दणाणून गेले. सुतार गल्ली परिसरातील या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यापैकी १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावभर भीती व धाकधूक पसरली असून दसर्यापूर्वीच या अपघाताने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुतार गल्ली येथील सार्वजनिक मंडळाकडून दसर्याच्या तयारीसाठी पारंपरिक शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक दारू कामाचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरवर पोहोचला आणि क्षणातच परिसर धुराने गुदमरून गेला. गावकऱ्यांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले.