सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यभरात पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात एक “युवा” किंगमेकर ठरला आहे. शहरातील ८ पैकी केवळ एका मतदार संघात या युवा किंग मेकरच्या चाणक्य रणनितीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे विजयी झाले आहेत. विद्यमान आमदारांच्या हातातून हा मतदारसंघ काढून घेत किंगमेकर ठरलेले सुरेंद्र पठारे यांनी वडिलांच्या हातात विजय टाकला आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या समाजकारणानंतर प्रथमच वडिलांचा ‘हात’ धरून राजकारणात यशस्वी पाऊल ठेवत त्यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली असे म्हणावे लागेल. बापूसाहेब पठारे ५ हजार मताधिक्याने वडगाव शेरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
माजी आमदार असलेले बापूसाहेब पठारे गेल्या दोन निवडणुकांमधून बाहेर होते. ग्रामपंचायत ते विधानभवन असा प्रवास करणारे बापूसाहेब पठारे यांची नागरिकांशी चांगली नाळ जुळलेली आहे. परंतु, काही कारणास्तव ते २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकातून बाहेर राहिले. त्याठिकाणी एकवेळा भाजपचे योगेश मुळीक आणि गेल्या निवडणूकीत सुनिल टिंगरे यांनी विजय मिळवला होता. बापूसाहेब पठारे हे २०१९ ची निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रीय झाले होते.
दहा वर्ष राजकारणापासून दूरावलेले बापूसाहेब पठारे यांनी पुन्हा सक्रिय होत राजकारणाला सुरूवात केली, पण त्यांना मोलाची साथ मिळाली ती बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांची. गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदार संघतल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली.
सुरेंद्र पठारे यांनी प्रसिद्ध अशा सीईओपी महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. ते सीईओपीचे गोल्ड मेडिलीस्ट आहेत. शांत, सयमी असलेले सुरेंद्र पठारे यांचे मराठी, हिंदी आणि इंगज्री अशा तीनही भाषेवर प्रभुत्व आहे. वकृत्वासोबतच कामाचा देखील प्रचंड उत्साहा भरलेला आहे. वेगवेगळ्या उपक्रमांमधून ते सातत्याने मतदार संघात वेगवेगळ्या योजना, कार्यक्रम घेतात. त्यातूनच त्यांनी मतदार संघात आपली पकड मजबूत करण्यास सुरूवात केली होती.
हे सुद्धा वाचा : महायुतीला कौल मिळताच अजितदादांचे खास ट्वीट; म्हणाले, “जनतेने गुलाबी…”
विधानसभा निवडणूकी काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादीत फूट पडली अन् बापूसाहेब पठारे यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला. तेथून तिकीट घेत उमेदवारी देखील मिळविली. तेव्हापासूनच सुरेंद्र पठारे यांनी विजयाच्या निश्चयाने कामकाजाला सुरूवात केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून फिरत असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी अखेर वडिलांच्या हातात विजय टाकत वडगाव शेरीसाठी किंग मेकरची भूमिका बजावली आहे. यासोबतच पुढील राजकारणातील “किंग” म्हणून पाऊल देखील ठेवले असे म्हणता येईल.