• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Tara Tigress Blocked Path Of The Msrtc Bus In Dhebewadi Patan Satara Marathi News

पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला

Satara News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघीण STR-05 उर्फ ‘तारा’ला सोडण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2025 | 09:35 PM
पाटणकडे जाणाऱ्या ST बसची 'तारा'ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला

सातारा जिल्ह्यात वाघिणीचे दर्शन (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ढेबेवाडी खोऱ्यात तारा वाघिणीचे दर्शन
एसटी बससमोरून वाघिणीची धूम
प्रवाशांसह स्थानिकांचा जीव टांगणीला

कराड: पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मुक्तसंचार करणाऱ्या ‘तारा’ या प्रौढ वाघिणीचे बुधवारी सकाळी थरारक दर्शन झाले. माईंगडेवाडी येथे मुक्कामी असलेली एसटी बस (Satara) पाटणकडे रवाना होत असताना अचानक झुडपातून वाघीण थेट रस्त्यावर आल्याने काही क्षणांसाठी प्रवाशांचा श्वास रोखला गेला. वाघिणीची झलक पाहताच बसमधील प्रवाशांचे काळजाचे ठोके चुकले, तर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघीण STR-05 उर्फ ‘तारा’ला सोडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी तिने कुंपण ओलांडत यशस्वी मुक्तसंचार केला. काही दिवस सॉफ्ट रिलीज प्रक्रियेत असलेली तारा सुरक्षितपणे कुंपणाबाहेर पडून चांदोलीच्या कोअर जंगलात दाखल झाली होती.

यानंतर नैसर्गिक अधिवास शोधण्याच्या उद्देशाने तिने जंगल क्षेत्रात भटकंती सुरू केल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पाटण खोऱ्यासह लगतच्या ग्रामीण भागात अधूनमधून तिचे दर्शन होत असून, नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.

Tiger News: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ वाघांसाठी आहे पोषक; इतर भागांतून वाघिणी सह्याद्रीत आणण्याचे काम सुरू

बुधवारी सकाळी ढेबेवाडी खोऱ्यातील माईंगडेवाडी परिसरात तिचे पुन्हा दर्शन झाले. रस्त्यावर अचानक वाघीण आल्याने काही काळ वाहतूक थांबली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र या घटनेची चर्चा तालुक्यासह जिल्हाभरात रंगली आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, जंगलालगतच्या भागात अनावश्यक वर्दळ करू नये, असे सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Tara tigress blocked path of the msrtc bus in dhebewadi patan satara marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • Patan News
  • Satara
  • tiger
  • Tiger Project

संबंधित बातम्या

हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी
1

हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी

Satara News : ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः कर थकवतात, संरपंचांनी केला धक्कादायक आरोप
2

Satara News : ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः कर थकवतात, संरपंचांनी केला धक्कादायक आरोप

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला
3

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

Dec 24, 2025 | 11:23 PM
सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

Dec 24, 2025 | 11:14 PM
Aravalli Hills News: अरवलीच्या संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, नव्या खाणकामावर पूर्णतः बंदी

Aravalli Hills News: अरवलीच्या संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, नव्या खाणकामावर पूर्णतः बंदी

Dec 24, 2025 | 10:24 PM
Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Dec 24, 2025 | 10:21 PM
नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट

नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट

Dec 24, 2025 | 10:01 PM
Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Dec 24, 2025 | 10:00 PM
पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला

पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला

Dec 24, 2025 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.